डेंग्यूबाबत जनजागृती करण्यास आरोग्य विभागाकडून  भर

डेंग्यूबाबत जनजागृती करण्यास आरोग्य विभागाकडून भर

Published on

डेंगीबाबत जनजागृतीवर आरोग्य विभागाकडून भर
घर व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याचे महापालिकेचे आवाहन

पिंपरी,ता. २५ ः डासजन्य आजारांचा वाढता धोका पाहता पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य तसेच वैद्यकीय विभागामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. डेंगीबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यास भर दिला जात असून, महापालिकेकडून राबवण्यात येत असलेल्या उपाययोजनांमध्ये नागरिकांनी देखील सक्रियपणे सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. डेंगी हा विषाणूंमुळे होणारा आजार आहे. तो एडिस इजिप्ती डासाच्या चाव्याद्वारे माणसाच्या शरिरात प्रवेश करतो. हा आजार पसरविणारा डास दिवसा चावतो. साचलेल्या पाण्यात या डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे घरातील साहित्याची वेळोवेळी सफाई करावी तसेच घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

लक्षणे
- ताप येणे, डोके दुखणे, डोळे दुखणे, सांधे दुखणे, मासपेशी दुखणे
- ताप तसेच अंगावर लालसर पूरळ येतात
- उलट्या होणे, पोट दुखणे, थुंकी, उलटी, लघवीतून रक्त पडणे

काय करावे
- पाण्याच्या टाक्या, हौद, पाणी साठे झाकून ठेवावे.
- कुलर, फ्रिज, फुलदाणी यातील पाणी दर दोन-तीन दिवसांनी बदलावे.
- सेप्टीक टँकच्या व्हेंट पाइपला जाळी बसवावी.
- पाणी साठवणीचे हौद, भांडी स्वच्छ व कोरडी ठेवावीत.
- आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा.
- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नका.
- डेंगी आजारबाधीत भागात जाणे टाळा
- घर व परिसरात पावसाचे पाणी, सांडपाणी साचू देऊ नका.
- घरातील पाणीसाठे उघडे ठेवू नका.
- टाकाऊ व निरुपयोगी वस्तू उघड्यावर फेकू नका.


महापालिकेकडून राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना
-नियमित अळीनाशक फवारणी
-बाधित भागांमध्ये धूर फवारणी
- प्रत्येक प्रभागात आरोग्य निरीक्षकांमार्फत घरांचे सर्वेक्षण
- आरोग्य केंद्रांमध्ये मोफत तपासणी व औषधोपचार

‘‘महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत प्रतिबंधात्मक उपाय योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, डेंगीचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी घाबरून न जाता सहकार्य करावे. डेंगीवर वेळीच उपचार केल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होतो. त्यामुळे नागरिकांनी देखील डेंगी मलेरियाच्या नायनाटासाठी सर्वतोपरी सहकार्य करावे .’
ः-विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com