संवाद माझा

संवाद माझा

Published on

पाण्याच्या टाकीजवळ खड्डा
नवी सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानासमोर पाण्याची टाकीजवळ मोठा खड्डा पडला आहे. त्याने अपघात होण्याची शक्यता आहे. मात्र, महानगरपालिका त्याकडे दुर्लक्ष करत आहे.
- मनोज पवार, जुनी सांगवी
PNE25V26860

विशालनगरमधील पदपथ अस्वच्छ
पिंपळे निलखमधील विशालनगर येथील पदपथावर कचरा आणि झाडांच्या फांद्या पडलेल्या असतात. नदीकडून येणाऱ्या गाई आणि इतर जनावरे सायंकाळच्यावेळेस ठराविक ठिकाणी थांबून शेण टाकत असतात. बाजूलाच बसण्यासाठी सिमेंट बाक आहेत. परंतु शेणाच्या दुर्गंधीमुळे बसता येत नाही. खरं तर सर्व ज्येष्ठ नागरिक किंवा त्यांचे ग्रुप सायंकाळी गप्पा मारायला बसतात. पण, अशा घाणीमुळे कोणीही बसण्यास धजावत नाहीत. महापालिका स्वच्छतेकडे लक्ष देईल का?
- गोविंद गायकवाड, विशालनगर, पिंपळे निलख
PNE25V26863

धोकादायक खड्डा दुरुस्त करा
सांगवी फाट्याजवळील ढोरे पाटील भुयारी मार्गासमोर गेल्या १० ते १२ दिवसांपूर्वी एक मोठ्ठा व खोल खड्डा पडला आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. तरी महापालिकेच्या ‘ड’ प्रभाग क्षेत्रीय कार्यालयाने संबंधित तक्रारीचे निवारण करावे.
- सनी शिंदे, पिंपळे निलख
PNE25V26862

दुभाजकात फलक पडून
आकुर्डी सिग्नलला खंडोबा मंदिरासमोरील रस्ता दुभाजकामध्ये कित्येक महिन्यांपासून फलक पडलेला आहे. अशा प्रकारे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची मालमत्ता बऱ्याच ठिकाणी पडून आहे. नामफलक, दिशादर्शक, गतिरोधक, पुढे शाळा आहे यासारख्या फलकांचा योग्य ठिकाणी वापर करावा.
- सिराज बशीर शेख, आकुर्डी
PNE25V26861

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com