शालेय विद्यार्थी वाहतुकीत जबाबदारी महत्त्वाची

शालेय विद्यार्थी वाहतुकीत जबाबदारी महत्त्वाची

Published on

सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ४ : ‘‘शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक हा अतिशय संवेदनशील आणि जबाबदरीचे काम असून त्या करीता चालक आणि महिला मदतनीस यांची भूमिका आणि शाळा प्रशासनाची जबाबदारी महत्त्वाची आहे,’’ असे मार्गदर्शन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांनी केले.

पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि पोदार इंटरनॅशनल स्कूल यांच्यावतीने स्कूल बस चालक आणि महिला अटेंडंट यांच्याकरिता मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यावेळी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी पवन नव्हाडे, मोटार वाहन निरीक्षक अनिल वैरागडे, विद्यार्थी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष संपत पाचरणे, पिंपरी चिंचवड शालेय विद्यार्थी वाहतूक संघाचे अध्यक्ष सुनील लांडगे आणि स्कूल बस चालक आणि महिला अटेंडंट मदतनीस उपस्थित होते.
शालेय विद्यार्थी वाहतुकीबाबत घ्यावयाची काळजी याबाबत स्वामी यांनी मार्गदर्शन केले.

लोकमान्य हॉस्पिटलचे डॉ. जयवंत श्रीखंडे यांनी उपस्थितांना प्रथमोपचार आणि ‘सीपीआर‘चे महत्त्व यांचे प्रात्यक्षिक करून दाखवले. तसेच अपघाताच्या परिस्थितीत वैद्यकीयदृष्ट्या आपत्कालीन परिस्थिती कशी हाताळायची, याबाबतही मार्गदर्शन केले. तसेच अग्निशामक यंत्रणा चालवण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. प्रादेशिक परिवहन कार्यालयाद्वारे प्रकाशित ‘स्कूल बस पॉलीसी मार्गदर्शिका’ पुस्तकाचे आणि स्टिकर्सचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. भरत राठोड यांनी प्रास्ताविक आणि किशोर भट यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com