संवाद माझा

संवाद माझा

Published on

पाणीगळती थांबवा, रस्ता दुरुस्त करा
गेल्या २० ते २५ दिवसांपासून येथे एक जलवाहिनी फुटलेली आहे. त्यातून खूप प्रमाणात पाणी वाया जात आहे. तरी कृपया त्याची लवकरात लवकर दखल घेऊन दुरुस्ती करावी. नेवाळे वस्ती चौक ते राधानंद स्वामी चौक आणि पिंगळे रोड येथील रस्ता अतिशय चिखलमय आणि जलमय झालेला आहे. अनेक पादचारी, दुचाकी वाहने यातून घसरून पडतात. तरी प्रशासनाने पावसाचे कारण न देता येथील जनतेचा हा महत्वाचा गंभीर प्रश्‍न त्वरित मार्गी लावावा.
- हेमंत धांडे, नेवाळे वस्ती
25V27440

ज्योतिबानगरमधील चेंबरची दुरुस्ती हवी
निगडी - तळवडे रस्ता अतिशय जास्त वाहतूक असून अनेक कामगार, लघुउद्योजक कामानिमित्त तेथून ये - जा करत असतात. परंतु या रस्त्यावर ज्योतिबानगर येथे नॅशनल वजन काट्याच्या विरुद्ध बाजूला असलेल्या दुर्गेश फाउन्ड्रीच्या शेजारी असणाऱ्या गोल चेंबरची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. सर्व घाणपाणी चेंबरमधून बाहेर पडून मुख्य रस्त्यावर येत आहे. त्यामुळे दुचाकी घसरुन मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कृपया लवकरात लवकर गोल चेंबरची दुरुस्ती करावी.
- निर्गुण थोरे, चऱ्होली
PNE25V27436

पादचाऱ्यांसाठी गतिरोधक बसवा
मानकर चौक कस्पटे वस्ती वाकड सात्विक मिसळसमोर गतिरोधक बसविण्यात यावेत. रस्त्याच्या दोन्ही दिशांनी वाहनांची सतत वेगाने ये-जा चालू असते. त्यामुळे सर्व पादचाऱ्यांना धोका पत्करुन रस्ता ओलांडावा लागत आहे. गतिरोधकाअभावी एखाद्याच्या जिवावर बेतू शकते.
- पंडित सुतार, वाकड
PNE25V27439

लोंबकळत्या तारांचा धोका
गेल्या काही महिन्यांपासून विद्यानगर प्रभाग क्रमांक १० येथील पथदिवे बंद आहेत. त्यामुळे रात्री परिसरात खूप अंधार असतो. काही अनुसूचित प्रकार घडू शकतो. पथदिव्यांच्या तारा खाली लोंबकळत आहेत. त्यामुळे अपघात घडून जीवितहानी होऊ शकते. महावितरणला अनेक वेळा कळविले आहे. परंतु ते त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांनी जबाबदारी पूर्ण आपले काम करावे.
- तुषार काशीद, चिंचवड
PNE25V27437

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com