‘एचए’ प्राथमिक शाळेत रंगला
माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

‘एचए’ प्राथमिक शाळेत रंगला माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

Published on

पिंपरी, ता. ६ ः एच. ए. प्राथमिक शाळेत १९७५ मध्ये बालवाडीमध्ये प्रवेश घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा ‘रजत भवन’मध्ये मेळावा पार पडला. सर्व माजी विद्यार्थी स्वागताने व एकमेकांच्या भेटीने भारावून गेलेले होते.
मुख्याध्यापिका सुरेखा जाधव, शिक्षिका अर्चना गोरे, शहनाज हेब्बाळकर, श्यामला दाभाडे, धनश्री पवार यांनी आलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे औक्षण केले. यावेळी मोहन बाबर, सुरेंद्र मोरे, मंदा कंद, शीला बडदाळ, उमेश कुलकर्णी, अभय पिंपळीकर, पोलिस उपनिरीक्षक विजयकुमार तांबे, प्रकाश तेलंगी, सुधीर भोसले, ॲड. मनीषा गवळी, सविता पवार उपस्थित होते.

शाळेच्या शिक्षिका समीक्षा ईसवे, अनिता येनगुल, अनघा कडू, सीमा हांगे, रत्नाकर वरवडेकर, विठ्ठल मोरे यांनी गायन व वादन केले. माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एकनाथ बुरसे, उपमुख्याध्यापिका आशा माने, पर्यवेक्षिका अनिता कदम यांच्यावतीने राजू गायकवाड व नायडू सरांनी सन्मान स्वीकारला. माजी विद्यार्थ्यांनी बालवर्गाच्या २०० विद्यार्थ्यांना मण्यांच्या पाट्यांचे वाटप केले. शैलेश भावसार यांनी गाणी गायली व राजेश चिट्टे यांनी मिकी माऊसचा ड्रेस घालून डान्स केला. दिलीप कंद, माजी सैनिक सुनील पवार व दिनेश मानकर यांनी मनोगत व्यक्त केली. माजी मुख्याध्यापिका शकुंतला ढवळीकर यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
प्रास्ताविक मोहन बाबर यांनी केले. अजित गुजराथी यांनी आभार मानले. शिक्षक डॉ. विठ्ठल मोरे यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com