स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वाढीव वीजबिल

स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वाढीव वीजबिल

Published on

पिंपरी, ता. १ : महावितरणने नवीन स्मार्ट वीजमीटर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यंत्रणा बदलली जात आहे. मात्र, जे मीटर बदलले त्यातील काही नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाढीव बिल आल्याचा दावा करण्यात आला आहे. याविरोधात पूर्णानगर येथील नागरिकांनी असंतोष व्‍यक्त केला आहे.
ज्या घरांमध्ये सरासरी हजार रुपये बिल येत होते, तिथे दीड हजार, दोन हजार किंवा त्याहीपेक्षा जास्त बिल आले आहेत. सध्या मुलांच्या शाळा सुरू झाल्याने पालकांचा खर्च वाढला आहे. त्यातच बिल वाढवून आल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वेळेवर बिल भरले नाही, तर वीज पुरवठा खंडीत करण्याचा इशारा दिला जात आहे. त्यामुळे नागरिक हतबल आहेत. महावितरण अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेत संगणकावर बिल तपासून दाखवले. तसेच ‘‘जुने मीटर हे फॉल्टी होते. त्यामुळे स्लो चालत होते. त्यामुळे बिल कमी येत होते,’’ असा दावा केला. यावर ‘‘मीटर आम्ही बाजारातून आणलेले नाहीत. मीटर हे महावितरणने बसवलेले होते. मग ते नादुरुस्त कसे, जे नवीन मीटर बसवले ते तरी चांगले असतील कशावरून?’’, असे प्रश्न नागरिक विचारत आहेत. त्यामुळे याबाबत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जनसंवाद सभा घ्यावी आणि नागरिकांच्या शंकेचे निरसन करावे, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी नक्षत्र फेज-२ सोसायटीचे सेक्रेटरी अजय संभाजी पाताडे, उपाध्यक्ष पंकज निकम, राजेश नागरे, सतीश श्यालेन तसेच इतर सोसायटीतील सभासद व नागरिक उपस्थित होते.

पूर्णानगर येथे काही ठिकाणी जुने मीटर होते. ते व्यवस्थित कार्यरत नव्हते. आता सध्या वापराप्रमाणे वीजबिल येत आहे. नागरिकांनी सहकार्य केल्यावर मीटरची तपासणी करण्यात येईल. त्यासाठी तपासणी दर भरणे अपेक्षित आहे.
-एम. बी. मुंडे, सहाय्यक अभियंता, आकुर्डी उपविभाग, महावितरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com