‘हरित सेतू’ उपक्रमातून पदपथ, सायकलवर भर
राहुल हातोले : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ३ : निगडी-प्राधिकरण परिसरात महापालिकेने ‘हरित सेतू’ उपक्रम सुरू केला आहे. यात प्रामुख्याने वाहनांचा वापर कमी करणे, सायकल-पदपथ वापराला चालना देणे यावर भर देण्यात येत आहे. सध्या या प्रकल्पाचे काम सुरू आहे.
नागरिकांच्या दैनंदिन प्रवासात आमूलाग्र बदल घडविण्याच्या दृष्टीने ‘हरित सेतू’ प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शहरात एकीकडे ‘अर्बन स्ट्रीट’ प्रकल्पांतर्गत रस्त्यांचे सुशोभीकरण, स्मार्ट सिटीच्या संकल्पनांवर आधारित कामे सुरू आहेत. तर, दुसरीकडे ‘हरित सेतू’च्या माध्यमातून पादचारी, सायकलस्वार, तसेच सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय निवडणाऱ्यांना अधिक सुरक्षित व सुलभ मार्ग उपलब्ध होणार आहे. या सुविधांमुळे नागरिक खासगी वाहने कमी वापरतील, असा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.
उपक्रमाची वैशिष्ट्ये :
पदपथ आणि सायकल ट्रॅकचे जाळे : सेक्टर २४, २५, २६, २७ आणि २८ या भागांमध्ये एकूण २२ किमी लांबीचे पदपथ आणि सायकल ट्रॅक विकसित केले जात आहेत.
सार्वजनिक ठिकाणांची जोडणी :
रेल्वे, बस स्थानक, मेट्रो स्टेशन, राज्य व केंद्र सरकारची कार्यालये, शाळा, बाजार यासारख्या ठिकाणांशी सहज चालत किंवा सायकलवरून जाता येईल, असा मार्ग तयार होत आहे.
संकल्पनेचा इतिहास :
साधारणपणे २०१९ मध्ये ‘हरित सेतू’ संकल्पना उदयाला आली. बिल्डर्स, आर्किटेक्ट आणि नागरी प्रतिनिधी यांची कार्यशाळा ‘सीआयआरटी’ येथे घेण्यात आली. या माध्यमातून हरित, स्वच्छ आणि सुरक्षित शहर घडवण्याचा हेतू.
कामाची सद्यस्थिती :
सध्या सुमारे २० टक्के कामे पूर्ण
प्रकल्पाची सुरुवात : ऑक्टोबर २०२४
काम पूर्ण होण्याची अपेक्षित मुदत : डिसेंबर २०२६
एकूण खर्च : १३० कोटी रुपये
अपेक्षित परिणाम
नागरिकांचा शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारेल.
वाहतुकीचा ताण कमी होईल.
पार्किंग समस्या सुटण्यास मदत
अपघातांची संख्या कमी होईल.
‘हरित सेतू’ हा प्रकल्प शहराच्या पर्यावरणस्नेही भविष्यासाठी उचललेले पाऊल
‘हरित सेतू’ उपक्रमामुळे सर्व सार्वजनिक ठिकाणे पदपथ, सायकल ट्रॅकने जोडले जाणार आहेत. वाहनांचा वापर कमी होऊन शहरातील प्रदूषण कमी होणार आहे. शहरात सायकल वापरासह चालण्यास प्राधान्य देणारी संस्कृती विकसित होईल.
- बापुसाहेब गायकवाड, सहशहर अभियंता, पिं. चिं. महापालिका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.