घरकूल भाजी मंडईत 
ओटे, पाणी, वीज द्या
फ क्षेत्रीय कार्यालयासमोर फेरीवाल्यांचे आंदोलन

घरकूल भाजी मंडईत ओटे, पाणी, वीज द्या फ क्षेत्रीय कार्यालयासमोर फेरीवाल्यांचे आंदोलन

Published on

पिंपरी, ता. ३ ः पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या फ क्षेत्रीय कार्यक्षेत्रामध्ये असणाऱ्या सेक्टर १७ व १९ घरकूल येथे भाजी मंडई हॉकर झोन निर्माण केला. येथे बसून व्यवसाय करण्यासाठी काँक्रिटचा कोबा करण्यात आला. मात्र, याठिकाणी पत्रा शेड, ओटे, वीज, पाणी नसल्यामुळे व्यावसायिकांची गैरसोय होत आहे. या सुविधांसाठी नॅशनल हॉकर फेडरेशन आणि महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्यावतीने फ क्षेत्रीय कार्यालयासमोर बुधवारी (ता. २) आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. माजी नगरसेवक मारुती भापकर, महिलाध्यक्षा वृषाली पाटणे, मनपा समिती सदस्य किसन भोसले, सलीम डांगे, नंदा तेलगोटे, राजू बिराजदार, सूरज देशमाने, सचिन नागणे, जुबेर शेख, बरगल्ली गावडे, माधुरी जलमुलवार, विनायक लाटे, सुनील भोसले, शेखर पाटील, शमशुद्दीन शेख, शारदा राक्षे, आशा बनसोडे, बबिता बनसोडे, सीमा गायकवाड, विद्या झेंडे, शारदा वानखेडे, सविता हिंगणकर आदी सहभागी झाले होते.

सेक्टर १७ व १९ घरकुल चिखली प्राधिकरण येथे सुमारे ६ हजार २५० घरांचा गृहप्रकल्प आहे. येथे विक्रेत्यांना पावसाचा व उन्हाचा त्रास सहन करावा लागतो. भाजी विक्रेत्यांच्या मागणीनुसार येथे काँक्रिटचा कोबा केला. मात्र, पत्र्याचे शेड, साहित्य ठेवण्यासाठी व बसण्यासाठी ओटे, वीज सेवा, पिण्यासाठी पाणी, तसेच महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नाहीत. या मागण्यांची पूर्तता करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांना मागणीचे निवेदन दिले. पथविक्रेता प्रमाणपत्र क्षेत्रीय कार्यालयातच द्यावेत, भूमी आणि जिंदगी विभागाकडे सेवा देण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी देखील मागणी करण्यात आली.

फोटो ः 28049

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com