वायसीएम रुग्णालयात ज्येष्ठाचा मृत्यू
पिंपरी, ता. ३ : येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात बुधवार (ता.२) सायंकाळी एका ज्येष्ठाचा मृत्यू झाला. ‘‘डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाला आहे,’’ असा आरोप करत हे शवविच्छेदन ‘इन कॅमेरा’ करण्याची मागणी मृताच्या नातेवाईकांनी केली.
विष्णू संभाजी चव्हाण (वय ६४) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोटात दुखत असल्याने मुलगा विशाल यांनी त्यांना मंगळवारी (ता.१) सकाळी येथे आणले होते. तपासणीनंतर त्यांना अतिदक्षता विभागात नेण्यात आले. पण, सायंकाळच्या सुमारास भेटण्यास आलेल्या नातेवाईकांनीच रुग्ण हालचाल करत नसल्याचे डॉक्टरांच्या निर्दशनास आणून दिले. त्यामुळे डॉक्टरांनी उपचारात हलगर्जीपणा केल्याची तक्रार विशाल यांनी रुग्णालयाचे अधिष्ठाता राजेश वाबळे यांच्याकडे केली आहे. नातेवाईकांनी अर्ज केल्यावर ‘इन कॅमेरा’ शवविच्छेदन करण्यात येईल, असे वाबळे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.