संवाद नागरीकांचा
खोदकामाने चालणे अवघड
तळेगाव - वराळे रस्त्यावर दुतर्फा खोदकाम केल्याने पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागाच शिल्लक राहिलेला नाही. पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. तेते वाहतूक नियंत्रण आणि नियोजन करणे आवश्यक आहे.
- मोहन गद्रे, तळेगाव दाभाडे
PNE25V28232
काटे वस्तीतील रस्ता दुरुस्त करा
पुणे - आळंदी रस्त्यावरील काटे वस्ती गल्ली क्र. पाचमध्ये मोठे खड्डे पडले आहेत. त्याची तक्रार महापालिकेच्या ‘सारथी’ वर २८ जून २०२५ रोजी दिली आहे. मात्र, अद्याप कार्यवाही करण्यात आली नाही. स्थापत्य विभागाने त्वरित लक्ष घालून कार्यवाही करावी.
- बबन किसन तापकीर, काटे वस्ती
NE25V28233
कठडा तुटल्याने अपघाताचा धोका
पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण यांच्या अंतर्गत टाटा मोटर्स जंक्शन येथील स्पाईन रस्त्यावरील उड्डाणपुलावरील लोखंडी कठडा (रेलिंग) काही दिवसांपासून तुटलेला आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी त्याने जीवितहानी होऊ शकते. हा परिसर अत्यंत रहदारीचा आहे. महापालिकेने याची तत्काळ दखल घेऊन कठड्याची दुरुस्ती करावी. जेणेकरून नागरिकांचे जिवीत सुरक्षित राहील.
- निर्गुण थोरे, चऱ्होली बुद्रूक
PNE25V28231
वाकडला दूषित पाणी पुरवठा
गेल्या दोन आठवड्यांपासून वाकडमध्ये दूषित पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे ग्रीन ड्राईव्ह रोड परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये नागरिकांना आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. दूषित पाण्यामुळे विषाणू संसर्ग होऊन मुले आणि ज्येष्ठ नागरिक सतत आजारी पडत आहेत. कृपया याची दखल घेण्यात यावी.
- हरीश पवार, वाकड
NE25V28230
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.