सोमाटणे चौक वाहतूक कोंडीच्या विळख्यात

सोमाटणे चौक वाहतूक कोंडीच्या विळख्यात

Published on

सोमाटणे, ता. ३ : सोमाटणे चौकात सेवा रस्त्यावरील विक्रेत्यांमुळे वाहतूक कोंडी वाढली आहे. यामुळे अनेकदा रुग्णवाहिकांनाही अडथळा निर्माण होत आहे. या समस्येकडे गांभीर्याने पाहून तोडगा काढण्याची मागणी होत आहे.

सोमाटणे चौकात विक्रेत्यांनी पुणे-मुंबई महामार्गावर येऊ नये, यासाठी रस्त्यालगत दगडी कठडा बांधून त्यावर लोखंडी ग्रिल बसवले. स्थानिकांना ये-जा करण्यासाठी व शिरगाव, परंदवडी, द्रुतगती मार्गाकडे जा-ये करण्यासाठी सेवा रस्त्याचे रुंदीकरण करुन डांबरीकरण केले. यामुळे वाहतूक कोंडी कमी झाली होती. परंतु, त्यानंतर पुन्हा सेवारस्त्यावर अतिक्रमण करुन सुमारे पंचवीस विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढली असून याकडे रस्तेविकास महामंडळाचे दुर्लक्ष आहे. याचा परिणाम दररोज सकाळी, दुपारी व संध्याकाळी भाजीपाला व इतर पदार्थ, वस्तू खरेदीसाठी परिसरातील नागरिक सेवा रस्त्यावर मोठी गर्दी करतात. यामुळे वाहनांना रस्ता न राहिल्याने त्यांना अडथळा निर्माण होऊन येथे कोंडी सुरू झाली आहे. याचा सर्वाधिक फटका रुग्णवाहिकांना होत असून प्रसंगी अधिक वेळ रुग्णवाहिका सेवा रस्त्यावर अडकण्याचा प्रकार वारंवार होत असून. यामुळे रुग्णांना उपचारासाठी उशीर होतो प्रसंगी रुग्णांच्या जीवावर बेतण्याचे प्रकार सुरु झाले आहेत.दोन दिवसापुर्वी वाहतूक कोंडीत एक रुग्णावाहिका अडकल्याने रुग्णाला उपचारासाठी उशीर होऊन एका रुग्णाचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला होता,अशा घटना टाळण्यासाठी सेवा रस्त्यावरील दुकाने हलवणे गरजेचे आहे.

रुंदीकरणही निरुपयोगी
सोमाटणे चौक, पुणे-मुंबईकडे, द्रुतगती मार्गाकडे, परंदवडीमार्गे पवनमावळाकडे, शिरगावमार्गे कासारसाईकडे ये-जा करणारी सर्व मार्गाकडील वाहने सोमाटणे चौकात एकत्र येतात. यामुळे येथे वाहतूक कोंडी वाढली होती. ती कमी करण्यासाठी रस्ते विकास महामंडळाने गेल्या वर्षी घोरावडेश्वर पायथा ते तळेगाव खिंड यादरम्यान रस्त्याचे रुंदीकरण केले. पण, येथे पुन्हा वाहतूक कोंडी वाढली आहे.

सोमाटणे येथे मोठे रुग्णालय असल्याने जलद उपचारासाठी रुग्णांना येथे आणावे लागते. परंतु चौकातील वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिकेला अडथळा होत असल्याने उपचारास वेळ होतो. यासाठी वाहतूक कोंडीवर तातडीने उपाय करावेत.
- अजित मुऱ्हे, अध्यक्ष, मावळ अॅम्ब्युलन्स असोसिएशन.

सोमाटणे चौक येथे वाहतूक कोंडीची समस्या आम्ही अनुभवतो आहोता. ग्रामपंचायतीच्या सहकार्याने विक्रेत्यांसाठी पर्यायी जागा देण्याचा विचार करू.
- शैलेश मुऱ्हे, उपसरपंच, सोमाटणे

PNE25V28297

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com