मोबाईलसाठी तरुणावर कोयत्याने हल्ला
पिंपरी : मोबाईल मागितला असता मोबाईल न दिल्याने एका तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना दापोडीतील शितळामाता चौक येथे घडली. मोहम्मद ईरफान शेख (रा. इनामदार पोल्ट्री, पवार वस्ती, दापोडी) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी या प्रकरणी दापोडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सागर शाम गायकवाड (वय २०, रा. दापोडी) याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हा फिर्यादीच्या घरी गेला. आरोपीने फिर्यादीकडे मोबाईल मागितला असता मोबाईल देण्यास नकार दिल्याने आरोपीने मारण्यासाठी कोयता उगारला. त्यावेळी आरोपीला धक्का देत फिर्यादी घरातून पळाले. दरम्यान, आरोपीने पाठलाग करीत फिर्यादीच्या हातावर कोयत्याने वार केला. दापोडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी
पिंपरी : भरधाव कंटेनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना खराबवाडी येथे घडली. राजेश कुमार लालजित प्रसाद (वय ३५, रा. गोरखपूर, उत्तर प्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. तर सोमनाथ रामभाऊ कड (वय ४९, रा. स्पाईन सिटी, खराबवाडी) असे या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे त्यांच्या दुचाकीवरून घरी जात असताना पाठीमागून भरधाव आलेल्या कंटेनरने त्यांच्या दुचाकीस जोरात धडक दिली. यामध्ये फिर्यादी यांच्या हाताला व खांद्याला गंभीर दुखापत झाली.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.