खेळण्यातील नोटांवर खरे चलन लावून फसवले
पिंपरी, ता. ३ : मुलांच्या खेळण्यातील ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’च्या नोटांच्या बंडलवर खऱ्या नोटा लावत फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दोघांना अटक केली.
हिंजवडी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात पोलिसांनी चेतन गजानन इंगळे (वय २६, रा. नारायणनगर, हिंजवडी, मूळ - कुराकाकोडा, जळगाव) व आकाश गजानन दांडगे (वय २८, रा. शिंदेवस्ती, मारुंजी) यांना अटक केली आहे. या प्रकरणी प्रशांत आढाव (रा. भट्टे आळी, बावधन) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींनी ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’ नाव असलेल्या बनावट नोटांच्या बंडलच्या वर व खालील खऱ्या नोटा ठेवून त्या सर्व नोटा खऱ्या असल्याचे भासवले. त्यावरून फिर्याद देण्यात आली.
पाचशे रुपयांच्या सहा बनावट नोटा जप्त
बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी निगडी पोलिसांनी धीरज राठोड (वय... रा. ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शिरीष देशमुख (रा. रावेत) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी याने निगडीतील भेळ चौक येथील एचडीएफसी बँकेत रक्कम जमा केली. दरम्यान, नोटांची पडताळणी केली असता पाचशे रुपये दराच्या सहा नोटा बनावट असल्याचे निदर्शनास आले. आरोपीने या बनावट नोटा जवळ बाळगून त्याचा व्यवहारात वापर केल्याचे समोर आले आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.