पीएमआरडीए उभारणार 
सांस्कृतिक भवन

पीएमआरडीए उभारणार सांस्कृतिक भवन

Published on

पिंपरी,ता. ३ ः निगडी, प्राधिकरणातील सेक्टर २५ येथील गोदामाच्या ठिकाणी सांस्कृतिक भवन उभारण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. हे सांस्कृतिक भवन उभारण्याचा ठराव २०१९ मध्ये झाला होता. मात्र, त्यानंतर प्राधिकरण बरखास्त झाले. त्यामुळे याबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलले जात नव्हते. याबाबत वृक्ष प्राधिकरणाचे माजी सदस्य सुरेश वाडकर यांनी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा केला. आता या पाठपुराव्याला यश आले असून, सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचे पत्र ‘पीएमआरडीए’चे मुख्य अभियंता रिनाज पठाण यांनी दिले आहेत. 
यापूर्वी नवीन सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी निविदा काढण्यात आली होती. परंतु अपूर्ण निधी असल्यामुळे ती रद्द करावी लागली. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे पुरेसा निधी उपलब्ध असल्यामुळे फेरनिविदा काढून नवीन सांस्कृतिक भवन बांधण्यात यावे, अशी मागणी वाडकर यांनी केली होती. या मागणीची ‘पीएमआरडीए’ने दखल घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com