केंद्रीय प्रवेश प्रक्रियेविषयी रविवारी विनामूल्य मार्गदर्शन
सकाळ विद्या
पिंपरी, ता. ३ ः पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणानंतर प्रशिक्षण आणि प्लेसमेंटच्या संधी कुठे आहेत? दहावी - बारावीनंतर करिअरच्या संधी कोणत्या आहेत ? विविध अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया, त्याविषयी विद्यार्थी आणि पालकांना अनेक शंका, प्रश्न भेडसावतात. त्यांचे उत्तर देण्यासाठी ‘सकाळ विद्या’, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) व पिंपरी-चिंचवड विद्यापीठ यांच्यातर्फे येत्या शनिवारी (ता.५) विनामूल्य चर्चासत्राचे आयोजन केले आहे.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सकाळी साडेनऊ वाजता चर्चासत्राला सुरूवात होणार आहे. यात सीईटी, जेईई (मेन्स), जेईई (ॲडव्हान्स) अशा परीक्षांसह विविध अभ्यासक्रम व प्लेसमेंटच्या संधींबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. सीईटी, नीट, जेईई यासारख्या राष्ट्रीय पातळीवरील प्रवेश परीक्षांचा पाया कसा भक्कम करता येईल ? आणि अवघड वाटणाऱ्या परीक्षांवर प्रभुत्व कसे मिळवता येईल ? यासाठी योग्य मार्गदर्शन आवश्यक असते म्हणूनच विद्यार्थ्याला विषयातील मूलभूत संकल्पना स्पष्ट असतील. तरच अवघड अभ्यास सोपा होतो. पाठांतरापेक्षा संकल्पना समजून घेण्यावर भर दिला पाहिजे, याबाबत विवेक वेलणकर, डॉ. सुदीप थेपडे, डॉ. शीतलकुमार रवंदळे, डॉ. केतन देसले मार्गदर्शन करणार आहेत.
विनामूल्य मार्गदर्शन सत्र
विद्यार्थी आणि पालकांसाठी नवीन केंद्रीय प्रवेश प्रक्रियेबाबत (कॅप) तपशीलवार माहिती दिली जाणार आहे. बीई, बी.टेक, डिप्लोमा, एमबीए, बीबीए, बी.आर्किटेक्चर, एलएलबी, बी.फार्मसी, बी.डिझाईन, बी.एस्सी (सायबर सिक्युरिटी, क्लिनिकल साइकोलॉजी, न्यूट्रिशन आणि डायटिक्स, ॲनिमेशन मल्टिमीडिया), बीसीए, बी.व्होक आणि इतर अनेक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया समजवण्यात येणार आहे.
आणखी काय समजणार ?
- यंदाच्यावर्षी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमध्ये झालेले बदल
- पात्रता, कागदपत्रे व आवश्यक अटींची माहिती
- संस्थास्तरीय प्रवेश फेरी (आयएलआर) बाबत स्पष्टीकरण
- मुलींसाठी व तसेच इतर सर्व प्रकारच्या उच्च शिक्षणासाठी उपलब्ध शिष्यवृत्तीबद्दल मार्गदर्शन
- एनआरआय/पीआयओ/ओसीआय/एफएन कोटा प्रवेश प्रक्रियेबद्दल माहिती
- करिअर मार्गदर्शन, योग्य कोर्स निवड यासाठी तज्ज्ञांचे सल्ले
काय?, कुठे? कधी? केव्हा? कसे?...
काय? ः शैक्षणिक व करिअर चर्चासत्र
कुठे? ः प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड
कधी? ः शनिवार, ५ जुलै २०२५
केव्हा? ः सकाळी ९.३०
कसे? ः विनामूल्य
संपर्क ः ९७३०९५९६९९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.