हिंजवडी फेज २ ते लक्ष्मी चौक रस्ता होणार खुला 
रस्त्यातील अतिक्रमणांवर ‘पीएमआरडीए’कडून कारवाई

हिंजवडी फेज २ ते लक्ष्मी चौक रस्ता होणार खुला रस्त्यातील अतिक्रमणांवर ‘पीएमआरडीए’कडून कारवाई

Published on

पिंपरी, ता. ३ : हिंजवडी, माण, मारुंजी भागातील नागरी समस्या आणि वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ठोस पावले उचलण्यास सुरवात केली आहे. अतिक्रमण करण्यात आलेले रस्ते खुले करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. अतिक्रमण केलेला हिंजवडी फेज २ विप्रो सर्कल ते मारुंजी, लक्ष्मी चौक दरम्यानचा रस्ता गुरुवारी (ता. ३) वाहतुकीसाठी खुला करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली.
हिंजवडी तसेच मेट्रो मार्गासह परिसरातील अतिक्रमणासह इतर काही ठिकाणी ओढे नाल्यांतील पाण्याचा नैसर्गिक प्रवाह परस्पर बदल करून अडवल्याने संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्याअनुषंगाने वाहतूक कोंडी तसेच नागरी समस्या सोडवण्यासाठी गुरुवारपासून ‘पीएमआरडीए’चे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या आदेशानंतर कारवाईला सुरवात करण्यात आली. यात काही वर्षांपासून अतिक्रमण केल्यामुळे बंद असलेला हिंजवडी फेज २ विप्रो सर्कल ते मारुंजी लक्ष्मी चौक दरम्यानचा रस्ता वाहतुकीस खुला करण्याची कारवाई ‘पीएमआरडीए’सह विविध विभागांच्या समन्वयाने करण्यात आली.
या रस्त्यादरम्यान अतिक्रमण केलेल्या काही व्यावसायिकांनी स्वतः आपले अतिक्रमण काढून घेत वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करून दिल्याचे कारवाईदरम्यान पुढे आले. अतिक्रमणामुळे रखडलेल्या या रस्त्याचे काम ‘पीएमआरडीए’कडून हाती घेण्यात आल्याने वाहतूक कोंडीपासून मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि आयटी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांसाठी हा रस्ता रहदारीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.


‘सकाळ’च्या पाठपुराव्याचे यश
हिंजवडी आयटी पार्क परिसरात होणारी वाहतूक कोंडीची समस्या ‘सकाळ’ने सातत्याने लावून धरत त्यावर ठोस उपाययोजना वेळोवेळी सुचविल्या. उशिरा जागे झालेल्या पीएमआरडीए, हिंजवडी एमआयडीसी आणि ग्राम पंचायत प्रशासनाला अखेर कारवाई करावी लागली. हिंजवडी आयटी पार्क आणि परिसरातल्या ग्रामीण भागातील अतिक्रमण केलेले रस्ते वेळीच कारवाई करून खुले केले असते, तर आयटीयन्सना वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड देण्याची वेळ आली नसती, अशा प्रतिक्रिया आयटी क्षेत्रात उमटत आहेत.

------------
फोटोः 28349

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com