साथरोग उच्चाटनासाठी महापालिकेने कसली कंबर

साथरोग उच्चाटनासाठी महापालिकेने कसली कंबर

Published on

पिंपरी, ता. ३ : डेंग्यू व मलेरियासारख्या साथीच्या आजारांबाबत महापालिकेने ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ ही स्वच्छता व आरोग्य जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या पूर्णानगर येथील अटल बिहारी वाजपेयी उद्यान येथे मोहिमेचा गुरुवारी (ता. ३) शुभारंभ झाला.

उपक्रमांतर्गत डेंग्यू व मलेरियासारख्या साथीच्या आजारांपासून सुरक्षितता बाळगण्यासाठी स्वच्छतेचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवणे व प्रतिबंधात्मक उपायांची माहिती देण्यात येत आहे. याशिवाय आरोग्य विभागातर्फे कीटकनाशक फवारणी, धूर फवारणी, हँड स्प्रे उपकरणांद्वारे घराघरांत औषध फवारणी करण्यात येत आहे. नागरिकांनाही मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.


सामाजिक संस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

मोहिमेमध्ये एएसएम कॉलेज ऑफ कॉमर्स, सायन्स अँड टेक्नॉलॉजी (पूर्णानगर), विद्यावेली कॉलेज (शिवतेजनगर), कृती विकास समिती, करुणा महिला बचत गट, सावित्रीबाई फुले महिला बचत गट, अमृतबिंदू बहुउद्देशीय संस्था, विश्वशांती बुद्ध विहार, नक्षत्र महिला बचत गट तसेच अरुण पाटोळे स्पोर्ट्स फाउंडेशन (पूर्णानगर) यांचा समावेश होता.


‘आरोग्य विभागामार्फत डेंग्यू व मलेरियाच्या प्रतिबंधासाठी औषध फवारणीबरोबरच जनजागृतीलाही तितकेच महत्त्व दिले जात आहे. नागरिकांनी महापालिकेस सहकार्य करावे.’

- सचिन पवार, उप आयुक्त, आरोग्य विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com