पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या

पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या

Published on

पिंपरी, ता. ३ : पतीच्या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना चिंचवड येथील मोहननगर येथे घडली.
रिंकू मल्हारी भोसले (वय २०, रा. शेलार चाळ, मोहननगर, चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. मल्हारी संपत भोसले (वय २२) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी रिंकू यांचे वडील राजेंद्र धोंडिराम पौळ (रा. डोंजा, ता. परांडा, जि. धाराशिव) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मल्हार व रिंकू यांचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले. त्यांना एक मुलगा आहे. दरम्यान, लग्नानंतर पाच महिन्यांपासून आरोपी मल्हार हा पत्नी रिंकू यांना दारू पिवून शिवीगाळ, मारहाण करायचा. वारंवार पैशांची मागणी करून त्यांना मानसिक व शारीरिक त्रास दिला. तसेच, मंगळवारी सकाळी मल्हारी याने दारू पिऊन रिंकू यांच्याशी भांडण केले. या त्रासाला कंटाळून रिंकू यांनी राहत्या घरात साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com