मालवाहूतक संघटनांचा 
दुसऱ्या दिवशीही संप सुरूच 
खासगी बसचालकांची संपातून माघार

मालवाहूतक संघटनांचा दुसऱ्या दिवशीही संप सुरूच खासगी बसचालकांची संपातून माघार

Published on

पिंपरी, ता. ३ ः मालवाहतूक संघटनांनी मंगळवारी (ता. १) मध्यरात्रीपासून सुरू केलेले चक्काजाम आंदोलन सलग दुसऱ्या दिवशीही सुरूच होते. आंदोलनात शहरातील मालवाहतूक करणाऱ्या अनेक संघटना सहभागी झाल्या आहेत. आंदोलनातून मात्र खासगी बसचालकांनी माघार घेतली आहे. त्यामुळे या आंदोलनात फूट पडल्याचे दिसून येते.
ई-चलन प्रणालीतील अन्यायकारक दंडवसुली, क्लीनरची सक्ती, तसेच वाहनचालकांवर होणारा आर्थिक अन्याय याविरोधात राज्यातील मालवाहतूक संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. वाहनचालकांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून चक्का जाम आंदोलन सुरू केले आहे. राज्यातील मालवाहतूक करणाऱ्या विविध संघटना यात सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील तळोजा, भिवंडीसह अनेक भागात मालवाहतूक ठप्प झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील वाहनचालकांनीही वाहने बंद ठेवून आंदोलनात सहभाग घेतला. निगडीतील ट्रान्स्पोर्ट नगरीत गुरुवारी (ता. ३) मालवाहतूक करणाऱ्या विविध संघटना आणि वाहनचालकांनी शासनाच्या धोरणांविरोधात निदर्शने केले, तसेच दोन दिवसांत वाहनचालकांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. या वेळी महाराष्ट्र राज्य माल आणि प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे, असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्टस पुणेचे अध्यक्ष दिलीप देशमुख, उपाध्यक्ष सुमीत धुमाळ, कार्याध्यक्ष गौरव कदम, दलवीर चौधरी, अशोक काळे आणि वाहनचालक उपस्थित होते. मात्र अजूनही चिंचवड, चाकण, तळेगावसह इतर एमआयडीसी परिसरातील स्थानिक वाहन चालक या आंदोलनात सहभागी झाले नसल्याचे दिसून आले. त्यामुळे एमआयडीसीतील मालवाहतूक सुरळीत सुरू असल्याचे दिसून आले, तसेच राज्यातील इतर भागातूनही एमआयडीसीत सुटे भाग, कच्चामाल घेऊन मोठ्या संख्येने वाहने येत आहेत. त्यामुळे एमआयडीसीतील मालवाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही.
---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com