भोंदूबाबाच्या घरातून 
मोबाईल, आयपॅड जप्त

भोंदूबाबाच्या घरातून मोबाईल, आयपॅड जप्त

Published on

पिंपरी, ता. ३ : भक्तांच्या मोबाईलमध्ये गुपचूप अ‍ॅप डाऊनलोड करून, मोबाईलचा अ‍ॅक्सेस घेत त्यांचे खासगी क्षण पाहणाऱ्या आणि त्यांचे चित्रीकरण केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या भोंदू बाबाच्या घरातून बावधन पोलिसांनी तीन मोबाईल, दोन आयपॅड व काही औषधे जप्त केली आहेत. या वस्तू तपासणीसाठी पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवल्या आहेत.
प्रसाददादा उर्फ बाबा उर्फ प्रसाद दादा भीमराव तामदार (वय २९, रा. स्वामी समर्थ बिल्डिंग, पहिला मजला, सुसगाव) असे अटक केलेल्या भोंदू बाबाचे नाव आहे. याप्रकरणी देहूरोड येथील एका ३९ वर्षीय भक्ताने बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीने भक्तांच्या मोबाईलमध्ये त्यांच्या अपरोक्ष हिडन ॲप डाऊनलोड करून, त्याद्वारे भक्तांच्या मोबाईलच्या ॲक्टिव्हिटीचा ऍक्सेस घेतला. त्यानंतर मृत्यूची भीती दाखवत भक्तांना वेश्या किंवा प्रेयसीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास प्रवृत्त करून तो त्यांच्या हालचाली मोबाईल कॅमेऱ्याद्वारे टिपत होता.
-----------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com