गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार
पिंपरी, ता. ०३ : श्रीधरनगर (चिंचवड) येथील श्री दत्त सेवा मंडळातर्फे इयत्ता दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या डॉ. शिल्पागौरी गणपुले या होत्या. त्यांच्या हस्ते ३६ विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
डॉ. गणपुले यांनी स्वतःचे लहानपणापासून राष्ट्रपती व पंतप्रधान यांना भेटण्याचे स्वप्न कसे पूर्ण केले, याबद्दल सांगितले. तसेच, विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत व ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत. त्यामध्ये कितीही अडचणी आल्यातरीही त्याला न घाबरता तोंड देत यश संपादन करावे, असा सल्ला दिला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष वसंत बोरकर, उपाध्यक्ष रमेश गोसावी, अनिल पारगावकर, राजेंद्रनाथ गडकरी, स्वाती काकडे, संगीता चौधरी, नीता मुर्टेकर, प्रदीप तपस्वी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.