‘प्यार जिंदगी हैं...’ मैफलीला 
रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

‘प्यार जिंदगी हैं...’ मैफलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Published on

पिंपरी, ता. ४ ः ‘ये दिल मुझे बता दे...’, ‘घडी घडी मेरा दिल धडके...’, ‘दिल हूम हूम करे...’, ‘हमदम मेरे मान भी जाओ...’, ‘मेरी भिगी भिगी सी...’, ‘तेरा मेरा प्यार अमर...’, ‘मुझे रंग दे...’ या प्रेमगीतांच्या सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. निमित्त होते विविध भारती म्युझिकल इव्हेंट प्रस्तुत ‘प्यार जिंदगी हैं...’ या सुमधुर हिंदी-मराठी सुरेल गीतांच्या सांगीतिक मैफलीचे.
निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात पार पडलेल्या या विशेष सांगीतिक मैफलीत डॉ. किशोर वराडे, दिलीप तापकीर, विलास गाधडे, महिपत वरपे, विजय सहारे, शिरीष भागवत, सुहास पालेकर, शैलजा पालेकर, सुभाष बोरोले, प्राप्ती बोरोले, उज्ज्वला केळकर, सोनाक्षी बांबुरडे यांची उपस्थिती होती.
ईशस्तवनानंतर कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. विनायक कदम, नंदकुमार कांबळे, नेहा दंडवते, स्वाती भागवत, डॉ. सायली बांबुरडे, शुभांगी पवार, रजनी यावलकर, स्मिता उरणकर, अनिल जंगम, सतीश कापडी, विलास खरे, अरुण सरमाने या गायकांनी एकल आणि युगुलस्वरातील सादरीकरणातून अभिजात सुमधुर गीतांचा नजराणा पेश करत रसिकांची मने जिंकून घेतली. उत्तरोत्तर रंगलेल्या मैफलीत ‘भातुकलीच्या खेळामधली...’ या भावगीताने वन्स मोअर घेतला. ‘तुम पास आये...’, ‘दिल तो पागल हैं...’, ‘धिरे धिरे बोल कोई...’, ‘सुन बेलिया...’, ‘कोयल बोली दुनिया डोली...’, ‘कहो ना प्यार हैं...’, ‘मनवा लागे रे...’, ‘हम को हमी से...’ या गीतांसह ‘प्यार जिंदगी हैं...’ या मैफलीच्या शीर्षकगीताच्या सादरीकरणाला श्रोत्यांनी वन्स मोअरचा प्रतिसाद दिला. विनायक कदम यांनी संयोजन केले; कार्यक्रमाची संकल्पना नंदकुमार कांबळे यांची होती. अरुण सरमाने आणि स्वाती भागवत यांनी निवेदन केले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com