मावळ परिसरात 
पावसाचा जोर ओसरला

मावळ परिसरात पावसाचा जोर ओसरला

Published on

सोमाटणे, ता. ४ ः पावसाचा जोर कमी झाल्याने आज सकाळपासून कासारसाई, आढले, पवना या तीनही नद्यांचा पूर ओसरला आहे.
गेले बारा दिवस मावळात संततधार पाऊस पडत होता. यामुळे कासारसाई, पुसाणे, आढले, मळवंडी धरणातून होणऱ्या विसर्गामुळे कासारसाई नदीला आलेल्या पुरामुळे सांगवडे पूल पाण्याखाली गेला, आढले नदीला आलेल्या पुरामुळे दारुंब्रे पुलावर पाणी आले होते, मळवंडी धरणातील विसर्गामुळे व भात खाचरातून वाहणाऱ्या पाण्यामुळे पवना नदीला पूर आल्याने साळुंब्रे साकव पाण्याखाली गेला होता. त्यामुळे पवनमावळातील अनेक गावांची दळणवळण सेवा विस्कळीत झाली होती. परंतु आज पहाटेपासून पावसाने उघडीप दिली असून सायंकाळी पूर्ण पाऊस बंद झाला. पाऊस उघडल्याने कासारसाई धरणातील विसर्ग कमी केल्याने कासारसाई नदीचा पूर पूर्ण ओसरला. आढले, मळवंडी धरणाच्या सांडव्याचा विसर्ग कमी झाल्याने पवनेची पाणीपातळी आज कमी झाली असून पूर ओसरल्याने तीनही नद्यांच्या पुराचा धोका कमी होऊन जनजीवन सुरळीत सुरू झाले.
द्रुतगती मार्गावरून वाहणाऱ्या पाण्याचा जोर आज कमी झाल्याने रस्त्यावरून वाहणारे पाणी कमी झाले असून वाहतूक सुरळीत सुरू झाली. या पावसाने पुसाणे, आढले, मळवंडी धरणे शंभर टक्के भरले असून कासारसाई धरणात उपयुक्त पाणीसाठा १४ दशलक्ष घनमीटर तर एकूण पाणीसाठा १५.३० दशलक्ष घनमीटर ठेवण्यात आला असून धरणात ८७ टक्के ठेवण्यात आले आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com