रमाबाई आंबेडकर स्मारकासाठी
पिंपरीमध्ये आंदोलन

रमाबाई आंबेडकर स्मारकासाठी पिंपरीमध्ये आंदोलन

Published on

पिंपरी, ता. ४ : पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्‍मारकामागील जागा रमाबाई आंबेडकर स्‍मारकासाठी मोकळी ठेवावी, तसेच स्‍मारकाचे काम लवकर मार्गी लावावे, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने करण्यात आली. या मागणीसाठी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्‍मारक परिसरात आंदोलन करण्यात आले. या वेळी समितीचे पदाधिकारी, आंबेडकरी अनुयायी उपस्‍थित होते.
रमाबाई आंबेडकर यांच्या नियोजित स्मारकाच्या जागी पिंपरी चिंचवड महापालिकेने विविध कामांसाठी टाकलेले आरक्षण हटविणे गरजेचे आहे. त्या ठिकाणी रमाबाई आंबेडकर यांचे स्मारक झाले पाहिजे. तसेच भीमसृष्टी आणि फुले सृष्टीच्यामधील मोकळ्या जागेमध्ये पीएमपीएलच्या बस टर्मिनलचे आणि पोलिस स्टेशनचे आरक्षण नवीन प्रारूप आराखड्यात दाखवले आहे. ती जागा मोकळी ठेवण्यात यावी, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.
फोटोः 28466

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com