अतिक्रमणे काढण्याऐवजी पार्किंगची सोय

अतिक्रमणे काढण्याऐवजी पार्किंगची सोय

Published on

सोमाटणे, ता. ४ : सेवा रस्त्यावर व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यामुळे कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. तर, दुसऱ्या बाजूला या व्यावसायिकांच्या सोयीसाठी चक्क पांढरे पट्टे आखून पार्किंगचीही सुविधा करण्यात आली आहे. त्यामुळे रस्ता आणखी अरुंद झाला आहे.

पुणे-मुंबई महामार्ग वाहनसंख्येच्या मानाने अपुरा पडतो आहे. सध्या पर्यटनामुळे वाढलेली वाहनसंख्या, सेवा रस्त्यावरील व्यावसायिकांची अतिक्रमणे यामुळे सोमाटणे चौकासह सोमाटणे टोलनाका ते सोमाटणे चौक दरम्यानचा महामार्ग हा कोंडीच्या विळख्यात अडकला आहे. याचा सर्वाधिक फटका तातडीने उपचाराची गरज असणाऱ्या रुग्णांच्या वाहनांना बसतो. दरम्यान, वाहतूक कोंडी सोडवण्याची जबाबदारी टोल वसूल करणाऱ्या रस्ते विकास महामंडळाची आहे. प्रशासनाने महामार्गाचे रुंदीकरण, चौकात पुलाची बांधणी, स्थानिकांसाठी सेवारस्ता करणे गरजेचे आहे. पण, ज्यांच्याकडे रस्त्याच्या सुविधेचे कंत्राट आहे, त्या ‘आयआरबी’ कंपनीने उलट पवित्रा घेत पांढरे पट्टे आखले आहेत. तसेच सोमाटणे चौकात रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी ‘प्लॉस्टिक बॅरिकेड्स’ लावले आहेत. त्यामुळे महामार्गाची रुंदी आणखी कमी झाली आहे. या प्रकाराने वाहतूक कोंडी आणखी वाढण्याची भीती आहे.

सोमाटणे चौक परिसरातील अतिक्रमणांसंबंधी माहिती घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना आमच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
- राकेश सोनवणे, कार्यकारी अभियंता, रस्ते विकास महामंडळ

PNE25V28478

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com