ॲकॅडेमिक लीडरशिप पुरस्काराने प्राचार्य डॉ. नीरज व्यवहारे सन्मानित
पिंपरी, ता. ५ ः आकुर्डी स्थित डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नीरज व्यवहारे यांना ‘महाराष्ट्र ॲवॉर्ड फॉर ॲकॅडेमिक लीडरशिप २०२५’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
शैक्षणिक क्षेत्रातील आधुनिक शिक्षण प्रणाली, संशोधन, रोजगारक्षम विद्यार्थ्यांची जडणघडण, मूल्यवर्धित शिक्षण, शिक्षणाद्वारे सामाजिक बांधीलकी, शाश्वत विकास इत्यादी अनेक विभागांमध्ये महत्त्वपूर्ण योगदानासाठी महाराष्ट्र थिंक टॅंक तर्फे दिल्या गेलेल्या या पुरस्काराचे वितरण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले.
डॉ. व्यवहारे यांना शिक्षण क्षेत्रातील सुमारे २५ वर्षांचा अनुभव आहे व ते सुमारे १३ वर्षांपासून प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. या व्यतिरिक्त ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या फार्माकोलॉजी अभ्यास मंडळाचे विद्यमान अध्यक्ष व विद्या परिषदेचे सदस्य आहेत.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.