उद्धव व राज ठाकरे 
एकत्र येण्याचा आनंद
खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

उद्धव व राज ठाकरे एकत्र येण्याचा आनंद खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

Published on

पिंपरी, ता. ४ ः ‘‘उद्धव व राज ठाकरे एकत्र येत आहेत, याचा आनंद आहे. मी याचे पहिल्यापासूनच स्वागत करत आहे.’’ अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी दिली. हिंजवडी येथील पाहणी दौऱ्यानंतर प्रसारमाध्यमांशी त्या बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, ‘‘बाळासाहेबांचे कुटुंब म्हणजे ठाकरे आडनाव असे नाही. शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता हा ठाकरे आहे. त्यांनी प्रेमाने ही संघटना शून्यातून उभी केली आहे. या कुटुंबातील दोन लोक एकत्र येत असतील तर मी त्यांचे मनापासून स्वागत करते. राजकारणातील बाळासाहेबांचे योगदान कोणतीही ताकद संपवू शकत नाही.’’ दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत मात्र कोणतीही चर्चा सध्या सुरू नसल्याचे त्यांनी सांगितले.
मराठीबाबत राज्य सरकारने अयोग्य निर्णय घेतला होता. आता त्यांनी तो मागे घेतला आहे; याचे मी स्वागत करते, असे मत सुळे यांनी त्रिभाषा सूत्राबाबत व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com