सुरळीत वाहतुकीला ‘लाल सिग्नल’ शहरातील काही ठिकाणी सिग्नल बंद तर कोठे मोठ्या कालावधीमुळे वाहनांच्या रांगा
पिंपरी, ता. ४ : चौकातील सिग्नल हे वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी असतात. मात्र, सिग्नलच बंद असल्यास वाहतुकीचा बोजवारा उडतो, तसेच लाल सिग्नलचा कालावधी मोठा ठेवल्यास वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागतात, अशी स्थिती पिंपरी-चिंचवड शहरातील काही चौकात पहायला मिळते. त्यामुळे सिग्नलचे योग्य नियोजन नसल्याचे दिसून येते.
चौकातील सिग्नलमधील वेगवेगळ्या रंगांच्या प्रकाशाद्वारे (लाल, पिवळा, हिरवा) विशिष्ट दिशेकडील वाहतुकीला थांबायला किंवा सुरु ठेवायला मदत होते. सिग्नलमुळे चौकातून जाणाऱ्या गाड्या आणि पादचारी सुरक्षित राहतात. तसेच वाहतुकीचे योग्य नियमन होते. ज्यामुळे कोणताही गोंधळ किंवा कोंडी होत नाही. सिग्नलमुळे वाहतुकीला शिस्त लागते आणि प्रत्येकजण त्यांच्या वेळेनुसार आणि नियमांनुसार प्रवास करतो. सिग्नलमुळे चौकातून जाणाऱ्या गाड्यांची संख्या आणि त्यांचा वेग नियंत्रित ठेवता येतो. यासाठी रहदारीच्या रस्त्यावर सिग्नलची आवश्यकता असते. त्यानुसार वाहतूक पोलिसांनी सुचविल्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात १७० ठिकाणी सिग्नलची उभारणी केली आहे. त्याची देखभाल दुरुस्तीही महापालिकेकडे असते. दरम्यान, उभारलेल्या सिग्नलपैकी काही सिग्नल बंद स्थितीत असल्याचे दिसून येते तर काही ठिकाणी लाल सिग्नलचा कालावधी प्रमाणापेक्षा अधिक असल्याने वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागत आहेत.
-------------------
* उदाहरण
- निगडीतील भक्ती-शक्ती चौक ते त्रिवेणीनगर चौक मार्गावरील चिकन चौक तसेच त्रिवेणीनगर चौकात सिग्नल आहेत. मात्र, ते बंद स्थितीत असल्याने रस्ता प्रशस्त असतानाही त्याठिकाणी वाहतूक कोंडी होत असते.
- चिखलीतील साने चौक, मोई चौक येथील सिग्नल बंद.
- काळेवाडीतील तापकीर चौकाकडून नखाते वस्ती लिंकरोडकडे जाणाऱ्या चौकातील सिग्नल बंद
-----
स्थानिक नियोजनानुसार सिग्नलमध्ये बदल
काही वेळेला वाहतूक पोलिसांकडून सिग्नल स्थानिक नियोजनानुसार सिग्नल बंद ठेवले जात असतात. यामध्ये मिरवणूक, व्हीआयपी दौरा असे काही असल्यास वाहतूक नियोजनासाठी सिग्नल बंद ठेवावा लागतो. अशा ठिकाणी वाहतूक पोलिसांची अधिक कुमक तैनात करून वाहतूक सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न केले जातात.
------------------
मोठ्या कालावधीचा सिग्नल
जुन्या मुंबई -पुणे महामार्गावरील निगडी ते चिंचवड या मार्गावर मेट्रोचे काम सुरु असल्याने सेवा रस्ता अरुंद झाला आहे. केवळ एक वाहन बसेल इतकाच रस्ता शिल्लक राहतो. अशातच आकुर्डीतील खंडोबामाळ चौकातील लाल सिग्नलचा कालावधी तब्बल १६० सेकंदाचा असल्याने या मार्गावर वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागत आहे. यामुळे लाल सिग्नलचा कालावधी कमी करण्याची मागणी होत आहे.
--------
‘‘सिग्नलच्या देखभाल दुरुस्तीचे काम महापालिकेकडे असते. त्यानुसार वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व सिग्नलच्या देखभाल -दुरुस्तीचे काम वेळोवेळी केले जात असते. दरम्यान, काही वेळेला सिग्नल स्थानिक नियोजनानुसार वाहतूक पोलिसांकडून सिग्नल बंद ठेवले जात असतात.
- माणिक चव्हाण, सह शहर अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका.
----------------
‘‘सिग्नलसह वाहतुकीसंदर्भात सर्व चौकांचा आढावा घेतला जाईल. सिग्नल का बंद असतात तसेच सिग्नलच्या वेळा याबाबतची माहिती घेऊन त्यानुसार पुढील नियोजन केले जाईल.
-विवेक पाटील, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा.
-----------------
‘‘चौकातील सिग्नल सुरु असल्यास वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होते. मात्र, सिंगल बंद असल्यास तसेच वाहतूक कर्मचारी चौकात नसल्यास वाहन चालक कशाही पद्धतीने वाहन चालवितात. यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. त्यामुळे चौकातील सिग्नल सुरू असणे आवश्यक आहे.
- सुनील राजेभोसले, वाहन चालक.
--------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.