‘मनी लॉन्ड्रिंग’ गुन्ह्याच्या भीतीने महिलेला फसविले
पिंपरी, ता. ४ : ‘‘तुमच्या आधार कार्डचा वापर ‘मनी लॉन्ड्रिंग’साठी झाला आहे. याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. त्यातून सुटका करून घेण्यासाठी सांगितलेली प्रक्रिया पूर्ण कर,’’ असे सांगत महिलेची सात लाख २७ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली. ही घटना चिखलीतील साने चौक येथे घडली.
या प्रकरणी ४४ वर्षीय महिलेने चिखली पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. या चोरट्यांनी फिर्यादी महिलेशी फोनद्वारे संपर्क साधत महिलेला तिचा आधार क्रमांक एका मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात वापरला गेला आहे. हे प्रकरण अंधेरी पोलिसांकडे पाठवण्यात आले आहे. तिथून पोलिसांचे प्रमाणपत्र घेऊन ते विभागात जमा करण्यास सांगितले. त्यानंतर एका क्रमांकावर संपर्क करण्यास सांगितले. त्या व्यक्तीने महिलेची बँक खाते, कागदपत्रांची माहिती घेतली. बँकेतील जमा रक्कम रिझर्व्ह बॅंकेला पाठवावी लागेल, असे सांगून महिलेला चार लाख ८७ हजार ५०० रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. त्यानंतर महिलेच्या पर्सनल लोनमधून दोन लाख ४० हजार रुपये आरोपींनी वळवून घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.