योजना तळागाळात पोहोचविण्यासाठी संयुक्त उपक्रम

योजना तळागाळात पोहोचविण्यासाठी संयुक्त उपक्रम

Published on

पिंपरी, ता. ५ : महापालिकेच्या विविध योजनांची माहिती समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी वस्ती संसाधन केंद्र उपयुक्त ठरेल. या माध्यमातून वंचित घटकांना योजनांचा लाभ मिळवून देण्याचा व त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे, असे प्रतिपादन समाज विकास विभागाच्या उपायुक्त ममता शिंदे यांनी केले.
महापालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयात समाज विकास विभाग आणि सेंटर फॉर एडवोकेसी अँड रिसर्च (सिफार) यांच्या वतीने वस्ती संसाधन केंद्र स्थापन करण्यात आले आहे. त्याच्या उद्‍घाटनप्रसंगी उपायुक्त शिंदे बोलत होत्या. याप्रसंगी ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त तथा क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, दिव्यांग समाज विभाग व ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त निवेदिता घार्गे, प्रशासन अधिकारी दशरथ कांबळे, यार्डीच्या सीएसआर व्यवस्थापिका दिपन्वीता सेनगुप्ता तसेच प्रथम संस्था, प्रहार संघटना, टाटा स्ट्राईव्ह, लाइट हाऊस, मुस्कान, सारखी, एकता संघ, सीआयइ इंडिया, टेक महिंद्रा फाउंडेशन, विपला फाउंडेशन, आजीविका ब्युरो, अनुसंसाधन ट्रस्ट (साथी सेहत), काच पत्रा पंचायत या संस्थेचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
महापालिकेच्या समाज विकास विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे तसेच केंद्र व राज्य शासनाच्या सामाजिक सुरक्षा, आरोग्य व नागरी सुविधांविषयक योजनांचा लाभ समाजातील आर्थिक व सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत पोहोचविणे, हा वस्ती संसाधन केंद्राचा मुख्य उद्देश आहे. या माध्यमातून प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत विविध वस्ती पातळ्यांवर जनजागृती करण्यात येणार असून, नागरिकांमध्ये योजनांविषयी जागरूकता निर्माण केली जाणार आहे. याप्रसंगी वस्ती संसाधन केंद्राच्या उद्‍घाटनासोबतच समाज विकास माहिती पुस्तकाचे अनावरण, महापालिका आणि सीफार संस्थेच्या करारनामाचे हस्तांतरण करण्यात आले. प्रास्ताविक आनंद बाखडे, राज्य प्रकल्प व्यवस्थापक, सेंटर फॉर एडवोकेसी अँड रिसर्च यांनी केली. सूत्रसंचालन तृष्णा कांबळे आणि आभार प्रदर्शन प्रकल्प समन्वयक शंकर गवळी यांनी केले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com