शैक्षणिक संस्थेची गुणवत्ता, प्लेसमेंट पहा
डॉ. शीतलकुमार रवंदळे यांचा विद्यार्थी आणि पालकांना सल्ला

शैक्षणिक संस्थेची गुणवत्ता, प्लेसमेंट पहा डॉ. शीतलकुमार रवंदळे यांचा विद्यार्थी आणि पालकांना सल्ला

Published on

पिंपरी, ता. ५ ः ‘‘प्रवेश घेताना शैक्षणिक संस्थेची गुणवत्ता आणि प्लेसमेंट पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पण विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीच्या चांगल्या ग्रुपच्या महाविद्यालयांची निवड करणे आवश्‍यक आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण करताच प्लेसमेंटच्या माध्यमातून नोकरीची संधी उपलब्ध होतील,’’ असा सल्ला डॉ. शीतलकुमार रवंदळे यांनी विद्यार्थी आणि पालकांना दिला.

‘सकाळ’ विद्या आणि पिंपरी चिंचवड विद्यापीठ यांच्यातर्फे चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ‘शिक्षण क्षेत्रातील विविध पर्याय आणि प्रवेश प्रक्रिया’ या विषयावर मार्गदर्शनपर चर्चासत्र घेण्यात आले. यावेळी विद्यार्थी, पालक आणि शिक्षणतज्ज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, करिअर मार्गदर्शक विवेक वेलणकर, डॉ. शीतलकुमार रवंदळे, ‘सकाळ’चे उपसरव्यवस्थापक मिलिंद भुजबळ उपस्थित होते.
डॉ. गिरीश देसाई म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांनी पारंपरिक अभ्यासक्रमांपुरतेच मर्यादित राहू नये. आजच्या बदलत्या जगात विविध नव्या संधी उपलब्ध आहेत. योग्य दिशेने अभ्यासक्रम निवडल्यास उज्ज्वल भवितव्य निश्चित आहे.’’
विवेक वेलणकर म्हणाले,‘‘प्रवेश घेताना संस्थेची गुणवत्ता आणि प्लेसमेंट पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बारावी विज्ञान शाखेनंतर विद्यार्थ्यांसमोर वैद्यकीय, कृषी, फार्मसी, संरक्षण क्षेत्र, अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, फूड टेक्नॉलॉजी, पायलट, एयरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग आदी क्षेत्रांमध्ये करिअर संधी उपलब्ध असतात. केवळ एमबीबीएस पुरतेच स्वप्न मर्यादित ठेवू नये. फिजिओथेरपी, ऑडियोलॉजीसारख्या शाखांमध्येही उज्ज्वल भविष्य आहे.’’
डॉ. शीतलकुमार रवंदळे म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम निवडताना पुढील २५ वर्षांचा विचार करावा. त्यांच्या आवडी, कौशल्य आणि स्वभावानुसारच क्षेत्र निवडले तर यश मिळवणे सोपे होते. मर्चंट नेव्ही, सरकारी नोकऱ्या, परदेश शिक्षण, आयटी क्षेत्रातील संधी, अभियांत्रिकीच्या विविध शाखांमध्ये भविष्यातील संधी अधिक आहेत.’’

यंदाच्या प्रवेशासाठी होणार चार फेऱ्या
यावर्षी प्रवेशासाठीची केंद्रीय प्रक्रियेत बदल करण्यात आले आहेत. आतापर्यंत तीन फेऱ्या होत होत्या, त्याऐवजी आता चार फेऱ्या होतील. प्रत्येक फेरीत कॉलेज निवडीचा पर्याय फ्रिज करण्‍याची व्याप्ती वाढली आहे. पहिल्या फेरीचा फेरीत पहिला पर्याय, दुसऱ्‍या फेरीत पहिले तीन पर्याय तिसऱ्‍या फेरीत पहिले सहा पर्याय फ्रिज करावे करावे लागणार आहेत. ‘एनआरआय’च्या प्रवेश कोट्यात बदल करण्‍यात आला आहे. रक्ताच्या नात्याची अट घालण्यात आली आहे. संस्थात्मक कोट्यातील जागांसाठीचे नियम बदलले आहेत. आता, चार कॅप फेऱ्या पूर्ण झाल्यावरच या जागांसाठी प्रवेश दिला जाईल. तसेच, या जागांसाठी प्रवेश घेताना गुणवत्ता विचारात घेतली जाणार आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. केतन देसले यांनी दिली.

पीसीयु उत्तम विद्यापीठ
डॉ. प्रणव चरखा यांनी पीसीईटीचे पिंपरी चिंचवड विद्यापीठाची ( पीसीयु) माहिती दिली. या विद्यापीठाचे विविध महत्त्वाचे टप्पे उलगडून मांडले व प्रवेश प्रक्रिया समजावून सांगितली. विद्यापीठामधील विविध कोर्सची माहिती यावेळी देण्यात आली.


आर्किटेक्चरसाठी ‘नाटा’ अनिवार्य
डॉ. स्मिता सूर्यवंशी म्हणाले, ‘‘आर्किटेक्चर अभ्यासक्रमाकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या काही वर्षांपासून वाढत आहे. आर्किटेक्चरचा अभ्यासक्रम करण्यासाठी कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरच्या निकषानुसार, ज्या विद्यार्थ्यांनी १० + २ असा नवीन अभ्यासक्रम गणित या विषयासह यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे अथवा ज्या विद्यार्थ्यांनी १० + ३ असा पदविका अभ्यासक्रम किमान ५० टक्के गुण मिळवून यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे, ते विद्यार्थी आर्किटेक्चरच्या प्रवेश परीक्षेसाठी शैक्षणिकदृष्ट्या पात्र समजले जातात. नॅशनल अॅप्टिटय़ूड टेस्ट इन आर्किटेक्चर (एनएटीए म्हणजेच नाटा) ही प्रवेशपरीक्षा विद्यार्थ्यांना उत्तम गुणांसह उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. ’’

डॉ. स्मृती पाठक म्हणाल्या, ‘‘एमबीए आणि बीबीए हे दोन्ही व्यवसाय आणि व्यवस्थापन क्षेत्रातील पदव्या आहेत, पण त्यांचे स्वरूप आणि उद्दिष्ट्ये वेगळी आहेत. बीबीए हा पदवीपूर्व अभ्यासक्रम आहे, तर एमबीए हा पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे. बीबीए हा व्यवसाय आणि व्यवस्थापनात करियरसाठी पाया घालतो, तर एमबीए हे अधिक प्रगत ज्ञान आणि कौशल्यांसह करिअरला गती देतो. शैक्षणिक आणि करियरच्या उद्दिष्टांवर आधारित योग्य अभ्यासक्रम निवडू शकता. ’’
दरम्‍यान, डॉ. अनिश कारिया, डॉ. रामदास बिराजदार, डॉ. अमित पाटील, प्राजक्ता गावडे, चारूल देशपांडे आणि अभिषेक चौधरी यांनी विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया समजावून सांगितली.

फोटोः 28805, 28806, 28807, 28924

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com