संवाद माझा
तुटक्या झाकणाने अपघाताचा धोका
नवी सांगवीतील अहिल्यादेवी दशक्रिया घाट परिसरातील चेंबरचे झाकण तुटले आहे. तेथून मोठी जड वाहने नेहमी येत जात असतात. अपघात होण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेने लवकरात लवकर दुरुस्त करावे.
- मनोज पवार, पवारनगर, जुनी सांगवी
PNE25V28849
झाडांच्या फांद्या छाटाव्यात
पिंपळे निलख येथे इंगवले चौक जवळील छत्रपती शिवाजी महाराज पुलावर व पुलाखालून आलेल्या झाडाच्या फांद्या पदपथाबरोबरच रस्त्यावर आल्याने पादचारी व वाहनांना अडथळा ठरत आहेत. तरी महापालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाने संबंधित तक्रारीचे निवारण करावे.
- सनी शिंदे, पिंपळे निलख
PNE25V28841
भटक्या श्वानांचा बंदोबस्त करा
चिंचवड येथे लिंक रोडवर गजानन महाराज मंदिरासमोर भटके श्वान हिंडत असतात. या समस्येकडे कोणीही लक्ष देत नाही. महानगरपालिकेने त्यांचा बंदोबस्त करावा.
- सां. रा. वाठारकर, चिंचवड
NE25V28843
झाडांच्या सुरक्षा जाळ्या काढा
निगडी प्राधिकरण नवीन बीआरटी रोड लगत काही झाडांची पूर्ण वाढ होऊन देखील त्यांच्या सुरक्षा जाळ्या काढलेल्या नाहीत. नवीन पुलाच्या ब्लॉकमध्ये काही ठिकाणी पिंपळाची झाडे उगवली आहेत.
- अविनाश सावंत, प्राधिकरण
E25V28848
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.