अनधिकृत बांधकामावर कारवाई करा
आयुक्‍त डॉ. योगेश म्‍हसे यांचे अनधिकृत बांधकाम विभागाला आदेश

अनधिकृत बांधकामावर कारवाई करा आयुक्‍त डॉ. योगेश म्‍हसे यांचे अनधिकृत बांधकाम विभागाला आदेश

Published on

पिंपरी, ता. ५ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) अनधिकृत बांधकाम विभाग अनेक अनधिकृत बांधकामांवरील कारवाईकडे जाणीवपूर्वक काणाडोळा करत असल्‍याच्‍या तक्रारी प्राप्‍त झाल्‍या होत्‍या. त्‍यावरून आयुक्‍त डॉ. योगेश म्‍हसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना खडसावले आहे. वाहतूक कोंडीला कारण ठरणाऱ्या तसेच नियमबाह्य सर्व अनधिकृत बांधकामे त्वरित हटविण्याची सूचना म्‍हसे यांनी केली. त्यानंतर अतिक्रमण विभागाला जाग आली असून, शुक्रवारी (ता. ४) हिंजवडी, माण-मारुंजी या ठिकाणी कारवाई करण्यात आली.
‘पीएमआरडीए’च्‍या अतिक्रमण विभागाकडून होणाऱ्या कारवाईबाबत विकसक, शेतकरी यांच्याकडून
तक्रारी वाढत आहेत. याबाबत आयुक्‍त म्‍हसे यांच्‍याकडे अनेकांनी तक्रारींचे गाऱ्हाणे मांडले होते. त्‍यावरुन आयुक्‍तांनी अनधिकृत बांधकाम विभागाच्‍या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. शासनाच्‍या नियमांप्रमाणे कारवाई करा, वाहतूक कोंडीला कारणीभूत असलेले सर्व अनधिकृत बांधकामे, नियमबाह्य अनधिकृत बांधकामे सरसकट पाडण्याची कारवाई करण्याची सूचना आयुक्‍तांनी दिल्‍या. त्‍यानुसार अतिक्रमण विभागाने शुक्रवारी (ता. ४) कारवाई करण्यास सुरवात केली आहे.
हिंजवडी, माण आणि मारुंजी भागातील नैसर्गिक ओढे - नाल्यांभोवती अनधिकृतपणे बांधकाम तसेच पाण्याचा प्रवाह अडवल्यासह परस्पर इतरत्र वळल्याने काही दिवसांपूर्वी हिंजवडीत पूर परिस्थिती निर्माण झाली होती. या अनुषंगाने अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांवर हिंजवडी पोलिस ठाण्यात चार गुन्हे नोंदविण्यात आले. यासह मारुंजी भागात पाच ते सहा ठिकाणी कारवाई केली. या पैकी एका ठिकाणची कारवाई न्‍यायालयीन बाब म्‍हणून थांबविण्यात आल्‍याची माहिती पीएमआरडीए प्रशासनाने दिली.


‘‘अनधिकृत बांधकाम विभागाबाबत काही तक्रारी प्राप्‍त झाल्‍या होत्‍या. त्‍यानुसार संबंधित विभागाच्‍या अधिकाऱ्यांना अनधिकृत बांधकामे शासनाच्‍या नियमांप्रमाणे सरसकट काढण्याची सक्‍त सूचना दिली आहे.
- डॉ. योगेश म्‍हसे, आयुक्‍त. पीएमआरडीए.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com