नवनगर प्राधिकरणावरील 
रहिवाशांना प्रॉपर्टी कार्ड द्या
आमदार शंकर जगताप यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नवनगर प्राधिकरणावरील रहिवाशांना प्रॉपर्टी कार्ड द्या आमदार शंकर जगताप यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Published on

पिंपरी, ता. ४ ः पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या आरक्षित जागांवर गेल्या ४० ते ५० वर्षांपासून वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना मालकी हक्क मिळावा, यासाठी चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना निवेदन सादर केले आहे. शासनाने या संदर्भात विशेष बाब म्हणून धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
पिंपरी-चिंचवड परिसरात १९७२ मध्ये विविध शेतजमिनी व जागा आरक्षित करण्यात आल्या होत्या. १९८०-९० च्या दशकात स्थानिक शेतकऱ्यांनी त्या जागांवर गुंठा-दोन गुंठा प्लॉटिंग करून विकल्या. त्या जागांवर घरे बांधून नागरिक वास्तव्य करत आहेत. नंतर हे नवनगर प्राधिकरण ‘पीएमआरडीए’मध्ये विलीन झाले. त्यामुळे ताब्यातील भूखंडांचा कारभार पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे सोपविण्यात आला. या घरांना महापालिकेकडून नियमित पाणीपट्टी, मालमत्ता कर आकारला जातो. महावितरणकडून वीजजोड दिला जातो. आता नागरिकांना ७/१२ उतारे आणि प्रॉपर्टी कार्ड द्यावे, अशी मागणी आमदार जगताप यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
-----------
मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या मागण्या

- गुंठेवारी प्रकल्पातील ताबेदारांना मालकी हक्क बहाल करावा.
- घरपट्टी, वीजबिल, पाणीपट्टी या शुल्काचा ताब्याचा पुरावा म्हणून स्वीकारावा.
- ७/१२ उतारा व प्रॉपर्टी कार्ड नागरिकांच्या नावावर नोंदवावे.
- महापालिकेच्या ठरावाला मान्यता देऊन एक रुपयात भूखंड हस्तांतर करण्यास संमती द्यावी.
- यासंदर्भात विशेष शासन आदेश काढून निर्णय प्रक्रिया मार्गी लावावी.
- मध्यमवर्गीय कुटुंबांना कायदेशीर संरक्षण, नागरी सुविधा आणि मालकी हक्क मिळण्यासाठी यंत्रणांना तातडीचे निर्देश द्यावेत.

-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com