‘वेस्ट टू वंडर’ थीम पार्क लवकरच पूर्ण
पिंपरी, ता. ५ : ‘‘पिंपळे सौदागरमधील राजमाता जिजाऊ उद्यान येथे महापालिकेच्यावतीने ‘वेस्ट टू वंडर वर्ल्ड थीम पार्क’ साकारण्यात येत आहे. राज्यातील हे एकमेव उद्यान असणार आहे. जगातील सात आश्चर्य असणाऱ्या वास्तु व इतर ऐतिहासिक वास्तू या स्मारकाच्या स्वरूपात साकारण्यात येत आहे. हे थीम पार्क लवकरच पूर्ण होऊन नागरिकांसाठी खुले होईल’’, अशी माहिती महापालिकेचे विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी दिली.
टाकाऊपासून टिकाऊ या संकल्पनेमधून हे थीम पार्क बनवण्यात येत असून त्यादृष्टीने वस्तूंचा वापर केला जात आहे. एकूण १७ ऐतिहासिक वास्तू त्यामध्ये राहणार आहेत. जगातील सात आश्चर्यांसह ताजमहल, आयफेल टॉवर, बुर्ज खलिफा, लीनिंग टॉवर ऑफ पिसा, सिडनी ऑपेरा हाऊस, अजंता कव्ह, ला सागराडा फॅमिलीया, चिचेन इतजा, पिरामिड ऑफ गिझा, पेट्रा ऑफ जोर्डन, कोलोसियम ऑफ रोम, बिग बेन ऑफ लंडन, अंकोर वट ऑफ कंबोडिया, हंपी चारियट, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, ट्रेव्ही फाउंटन, माऊंट रश्मोर आदी वास्तू साकारण्यात येणार आहे. या संपूर्ण थीम पार्कसाठी एकूण ११.०२ कोटी रुपये इतका खर्च करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून हे होत आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहराच्या वैभवात भर पडणार आहे. तसेच हे ‘वेस्ट टू वंडर वर्ल्ड थीम पार्क’ पूर्ण झाल्यास राज्यातील एक उत्तम पर्यटन स्थळ होईल, असा विश्वास काटे यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.