अनधिकृत बांधकामप्रकरणी हिंजवडीत चौघांवर गुन्हा
पिंपरी : ओढ्या नाल्याच्या प्रवाहाची दिशा बदलून अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी चार जणांवर हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई हिंजवडी येथे करण्यात आली.
जागा मालक शशिकांत साखरे, शालिवाहन साखरे, विकसक विठ्ठल मोनाजी तडकेवार, जागामालक पंकज साखरे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ‘पीएमआरडीए’चे अधिकारी हरिष आंगद माने (रा. म्हेत्रेवाडी, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. ओढ्या नाल्याच्या प्रवाहाची दिशा बदलून त्याठिकाणी अनधिकृत बांधकाम केल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला. त्यामुळे चौघांवर पर्यावरण संरक्षण अधिनियम, जलप्रदूषण आणि प्रतिबंधक कायदा व महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलमांतर्गत कारवाई करण्यात आली.
---------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.