प्रबळ इच्छाशक्तीनेच ध्येयाची प्राप्ती
पिंपरी, ता. ५ ः ‘‘प्रत्येक व्यायाम प्रकारासाठी आपण वेळ हा काढू शकतो. ‘आयर्न मॅन’ सारखे उच्च दर्जाचे किताबही मिळू शकतो; पण त्यासाठी मनाची इच्छाशक्ती प्रबळ हवी. कुठल्याही गोष्टीला सातत्याची जोड दिली; तर यश हे आपल्या जवळ येऊन आपले उद्दिष्ट साध्य होते,’’ असा सल्ला २४ वेळचे ‘आयर्न मॅन’ किताब प्राप्त ॲथलिट दशरथ जाधव यांनी दिला.
पुण्यातील हिंदू जिमखाना येथे औद्योगिक क्रीडा संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा व पारितोषिक वितरण समारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. प्राज इंडस्ट्रीजचे महाव्यवस्थापक मिलिंद बावा, विजयकुमारन, औद्योगिक क्रीडा संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र नागेशकर, उपाध्यक्ष नरेंद्र कदम, सचिव वसंत ठोंबरे, खजिनदार प्रदीप वाघ, सहखजिनदार विजय हिंगे, स्पर्धा प्रमुख हरी देशपांडे, बालाजी नानिवडेकर, सिग्मा इलेक्ट्रिकलचे सुयोग फुलबडवे, टेट्रापॅकचे संतोष सोनटक्के, महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीचे दत्ता गायकवाड, जेसीबीचे सचिन कांबळे, एसकेएफचे संतोष शिंदे, कौस्तुभ नाडगोंडे आदी यावेळी उपस्थित होते.
नागेशकर म्हणाले, ‘‘कंपनीतील काम हे आपले कर्तव्य आहे तरी खेळ हा छंद प्रत्येकाने जोपासला पाहिजे. औद्योगिक क्रीडा संघटनेच्या स्पर्धा खेळाडूंसाठी एक उत्तम व्यासपीठ म्हणून आहेत. त्याचा सर्वांनी फायदा घ्यावा.’’
वार्षिक सर्वसाधारण विजेतेपदाचा करंडक टाटा मोटर्स लिमिटेडतर्फे प्रवीण तांबे, नितीन कदम यांनी तर उपविजेत्या पदाचा करंडक बजाज ऑटो आकुर्डीतर्फे अतुल काळोखे यांनी स्वीकारला. याच प्रसंगी पेरू देशात जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये पंच म्हणून काम पाहिलेल्या प्रशांत बेंद्रे (टाटा मोटर्स), देश-विदेशात शरीरसौष्ठव प्रकारामध्ये सुवर्णपदक मिळविणाऱ्या विजय पॉल (स्कोडा वोक्सवॅगन) व समरसता साहित्य परिषद आयोजित लोकमाता अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय लेखन स्पर्धेत जिल्हा पातळीवर द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या प्रदीप वाघ यांचाही सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी मयुरेश कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. नरेंद्र कदम यांनी प्रास्ताविक केले. विजय हिंगे, हरी देशपांडे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले; तर वसंत ठोंबरे यांनी आभार मानले.
PNE25V28982
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.