वृक्षारोपण करत कृषीदिन साजरा
सोमाटणे, ता. ६ : कृषीकन्या व गहुंजे ग्रामपंचायतीच्या वतीने आधुनिक शेती करण्याचा संदेश शेतकऱ्यांना देऊन वृक्षारोपणाने कृषीदिन साजरा करण्यात आला. आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या वतीने रिद्धी बोत्रे, माया धडस, आयुषी देसाई, मृदुला लांडगे, स्वानंदिनी लोखंडे, सानिका वाशिवले यांच्यावतीने ‘कृषी कन्या’ उपक्रमाअंतर्गत गहुंजे येथे प्रात्याक्षिकांसह शेतकरी प्रशिक्षण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या अंतर्गत गेल्या आठ दिवसांत वृक्षारोपणाचे महत्त्व, अधिक उत्पादन व रोगमुक्त पीक उत्पादन घेण्याचे तंत्र, आधुनिक शेतीचे फायदे, कमी क्षेत्रात अधिक उत्पादन मिळविण्याचे तंत्र, नैसर्गिक कीटनाशके व खतांचा वापर, पाणी व्यावस्थापन, माती परीक्षणाचे महत्त्व आदी विषयांचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले. सरपंच कुलदीप बोडके, सदस्य हिरामन आगळे, उद्योजक निखील बोडके, विश्वास येवले यांच्या हस्ते जिल्हा परिषेद प्राथमिक शाळेच्या प्रारंगणात अधिक ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या झाडांची लागवड करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.