वाचक लिहीतात
‘सकाळ’चे धन्यवाद
आज आषाढी एकादशीच्या पूजेला बसलो आणि ‘सकाळ’चा अंक घरामध्ये आला. उत्सुकतेने नेहमीप्रमाणे अंक उघडला तर आषाढी एकादशीचा विठ्ठलाचा साक्षात साखर फुटाणे आणि बुक्का असा प्रसाद घरपोच मिळाला आणि अत्यानंद झाला. ‘रामकृष्ण हरी पांडुरंग हरी’, ‘सकाळ’च्या या अभिनव उपक्रमाबद्दल खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी !
- अनिल पोटे निगडी प्राधिकरण
पीएमपी बसथांबे कधी होणार
गेल्या चार वर्षांपासून रेल्वे फेऱ्यांची संख्या कमी झाल्याने प्रवाशांचा कल पीएमपी बसकडे वाढला आहे. त्यामुळे बस उत्पन्नात लाखो रुपयांची वाढ झाली आहे. मात्र, प्रवाशांना बस थांबे नसल्यामुळे भर उन्हा-पावसात उभे राहण्याची वेळ आली आहे. हे बसथांबे आम्ही करणार, अशी घोषणा नगरपरिषदेसह लोकप्रतिनिधींनी केली आहे. मात्र, अद्याप त्याला मुहूर्त लागलेला नाही.
- नीलेश फलके, तळेगाव दाभाडे
जलतरण तलाव दुरुस्त करा
लोणावळा येथील नगर परिषदेच्या जलतरण तलावाची अवस्था बिकट झाली आहे. मागील १५ वर्षांपासून लोणावळेकर या तलावाच्या दुरुस्तीची वाट पाहत आहेत. पोहण्यासाठी नाइलाजास्तव लोकांना खासगी हॉटेल्समध्ये जावे लागत आहे. तरी लोणावळा नगर परिषदेला विनंती आहे की हा तलाव लवकरात लवकर दुरुस्त करावा. जेणेकरून स्थानिक लोकांना बाहेर जावे लागणार नाही.
- नीलेश भांबुरे, लोणावळा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.