अभंग स्कूलमध्ये वारी, अभंग पठण स्पर्धा

अभंग स्कूलमध्ये वारी, अभंग पठण स्पर्धा

Published on

पिंपरी, ता. ६ : श्रीक्षेत्र देहूतील सृजन फाउंडेशनचे अभंग इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये अभंग पठण स्पर्धेचे आयोजन केले होते. पहिल्या गटात इ. तिसरी व चौथीसाठी पाच अभंग ठेवण्यात आले. दुसऱ्या गटात इ. पाचवी, सहावी आणि सातवीसाठी १० अभंग पठणासाठी देण्यात आले. स्पर्धकांनी वारकऱ्यांच्या वेशभूषेत, टाळ व तबल्याच्या साथीने भक्तिमय वातावरणात अभंगांचे उत्तम सादरीकरण केले. सातवीतील कौस्तुभ लिंभोरे याने तबलावादन केले. वारकरी शिक्षण संस्थेतील शिक्षक प्रभाकर महाराज गाडेकर, शाळेतील सहशिक्षिका श्रुती अत्रे यांनी परीक्षकाची भूमिका बजावली. प्राचार्या डॉ. कविता अय्यर यांनी स्पर्धेतील विजेते घोषित केले. चौथीतील सई सागर गाडे-प्रथम, तिसरीतील शिवम मंगेश हगवणे- द्वितीय, चौथीतील सोहम राजेंद्र हराळे याने लहान गटातून तृतीय क्रमांक मिळविला. मोठ्या गटातून इ. पाचवीतील ओवी दुष्यंत काळोखे-प्रथम, श्लोक अविनाश भंडारे- द्वितीय, तर आरोही विपुल जाधव हिने तृतीय क्रमांक पटकावला. सृजन फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील कंद, सचिव प्रा. विकास कंद, उपप्राचार्या शैलजा स्वामी यावेळी उपस्थित होते. आढाव यांनी अभंग पठण स्पर्धेचे नियोजन केले. सहशिक्षिका रेखा अडागळे यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com