डॉन बॉक्सो आयटीआयमध्ये काळानुरूप बदल
पिंपरी, ता. ७ ः औद्योगिक क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन राज्य सरकारने आयटीआयमधील अभ्यासक्रमांमध्ये (ट्रेड)बदल केले आहे. उद्योगांसमवेत ‘टाय-अप’ करून नवनव्या योजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्यादृष्टीने डॉन बॉस्को आयटीआयमध्ये होतकरु तरुणांना विविध अभ्यासक्रम (ट्रेड) उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
कुशल कामगार तयार करणे व विद्यार्थांना स्वावलंबी बनविण्यासाठी चिंचवडच्या मोहननगरमधील डॉन बॉस्को आयटीआयमध्ये मेकॅनिक मोटार व्हेईकल, इलेक्ट्रिशियन कोर्स आणि इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक असे विविध अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. परिणामी, संस्था उद्योग-शैक्षणिक क्षेत्रातील दरी भरून काढण्यास मदत होणार आहे.
आयटीआयमधील प्रशिक्षण झाल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर अभियांत्रिकीमधील उच्च शिक्षणाचा पर्याय खुला असतो. आयटीआय प्रशिक्षित तरुण नोकरीसोबतच स्वयंरोजगार करण्याचाही विचारही करू शकतात. मेकॅनिक मोटर व्हेईकल, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, ऑटोमोबाइल रिपेअर, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग तंत्रज्ञ हे अभ्यासक्रम उद्योगांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानावर आधारित कौशल्ये देण्यासाठी तयार करण्यात आले आहेत.
समन्वयक सचिन औचारे म्हणाले, ‘‘डॉन बॉस्को आयटीआयमध्ये २ वर्षांसाठी एनसीव्हीटी आणि सहा महिन्यांसाठी एनएसडीसी अभ्यासक्रम करण्यात येणार आहे. अवसर जॉब प्लेसमेंट सर्विस सेवा देण्यात येते. विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा.’’
टेक्निशियन मेकाट्रॉनिक्स आणि ई-व्हेइकल कोर्स सारख्या नवीन युगाच्या अभ्यासक्रमांवर देखील काम करत आहोत. एनसीव्हीईटीने ठरवलेल्या अभ्यासक्रमानुसार, नवीन युगाच्या अभ्यासक्रमांमध्ये अल्पकालीन कार्यक्रम सुरू केले आहेत.’’
- फादर ॲन्टॉन डिसुजा, डॉन बॉस्को व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र, चिंचवड
नवीन युगाच्या अभ्यासक्रमांसह विद्यार्थ्यांना भविष्यासाठी कसे तयार करता येईल ? यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी सध्या आयटीआयमध्ये प्रशिक्षण देण्यात येत आहे. एनएसडीसी अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी आम्ही उद्योगांच्या संपर्कात आहोत.
- नीलेश चांदगुडे, प्राचार्य, डॉन बास्को आयटीआय
महिला, मुलींसाठी खास संधी
- ई-मोबिलिटी सर्व्हिस असिस्टंट कोर्स
कालावधी : ६ महिने
वयोगट : १८ ते २८ वर्षे
पूर्णपणे मोफत प्रशिक्षण
- रिफिनिशिंग कोर्स
(पेंटिंग/डेंटिंग क्षेत्रात करिअरची संधी)
कालावधी : ३ महिने
वयोगट : १८ ते २८ वर्षे
मोफत जेवण, वसतिगृहाची सुविधा (बाहेरगावच्या विद्यार्थिनींसाठी)
असे आहेत ट्रेड, प्रवेश क्षमता
मेकॅनिक मोटार व्हेईकल - २४
इलेक्ट्रिशियन - ४०
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक्स - ४०
मेकॅनिक ऑटो बॉडी रिपेअर - २०
फिटर - २०
वेल्डर - २०
ई. व्ही (ई मोबॅलिटी) सर्विस असिस्टंट - ३०
ॲडव्हान्स फिटर - २५
ॲडव्हान्स कॉम्प्युटर - २५
रिफिनीश कोर्स - ३०
रेफ्रिजरेशन आणि एअर कडिंशिंनिंग - २०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.