जाधववाडीत आठ दुचाकी पेटविल्या

जाधववाडीत आठ दुचाकी पेटविल्या

Published on

पिंपरी, ता. ६ : एकाने जुन्या भांडणाच्या कारणावरून आठ दुचाकी जाळल्‍या. ही घटना चिखलीतील जाधववाडी येथील साहिल पूरम हाउसिंग सोसायटीच्‍या वाहनतळामध्‍ये घडली. गणेश निवृत्ती मराठे (वय ५३, रा. साहिल पूरम हाउसिंग सोसायटी, प्लॉट नं.११४, राजे शिवाजीनगर, जाधववाडी, चिखली) याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी बाळासाहेब प्रमोद खरात (रा. साहिल पूरम हाउसिंग सोसायटी, राजे शिवाजीनगर, जाधववाडी, चिखली) यांनी चिखली पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. आरोपीने जुन्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादीच्या दुचाकीच्या पेट्रोल टाकीची नळी काढून माचीसच्या साहाय्याने आग लावली. तसेच सोसायटीत उभ्या इतर सात दुचाकी व एका इलेक्ट्रिक दुचाकीला आग लावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com