शालेय जगत
शालेय जगत
सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर, आकुर्डी
शाळेतर्फे निगडी प्राधिकरण येथील संत श्री तुकाराम महाराज उद्यान येथील विठ्ठल मंदिरामध्ये आषाढी एकादशी उत्सव साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी भजने सादर केली. संस्थेचे संस्थापक सचिव गोविंदराव दाभाडे, मुख्याध्यापक राजू माळे उपस्थित होते. प्रास्ताविक वेदिका कोशिरे, मीरा मगर, निवेदन दीपल पाटील या विद्यार्थिनींनी केले. इरण्णा धनशेट्टी, आरमान पठाण, दिव्या सोळंके यांनी भाषण केले. शिक्षिका नयना पाटील यांनी ‘‘आपण सर्वांनी भक्त पुंडलिकाप्रमाणे आई-वडिलांची सेवा करावी. त्यांच्यावर भक्ती ठेवावी त्यातूनच आपल्याला शांती समाधान मिळते,’’ असे विचार व्यक्त केले. आयोजन सविता पाटील, प्रतिमा काळे, कैलाश कोशिरे, चतुर आखाडे व अविनाश आखाडे आदी शिक्षकांनी केले.
डॉल्फिन प्री स्कूल, चिंचवड स्टेशन
विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीनिमित्त दिंडीचे आयोजन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी वारकरी पेहराव करत विठ्ठल - रुख्मिणीची मूर्ती, टाळ, तुळशी वृंदावन घेऊन ‘राम कृष्ण हरी’ असे भजन करत पालखी मिरवणूक काढली. विद्यार्थी व शिक्षकांनी फुगड्या घालून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मुलांनी संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्यावर आधारित अभंग सादर केले. विद्यार्थ्यांनी संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर , संत सोपानदेव, निवृत्ती मुक्ताबाई संत चोखामेळा, संत नामदेव यांच्या वेशभूषा परिधान केलेल्या होत्या. यावेळी कुमार गराडे, वैशाली गराडे उपस्थित होते.
जयवंत प्राथमिक शाळा
आषाढी एकादशीनिमित्त टाळ, मृदंग, ढोल ताशाच्या गजरात पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शारदा मुंढे यांच्या हस्ते पालखीपूजन करण्यात आले. या वेळी मुख्याध्यापिका वंदना सावंत, मुख्याध्यापक रावत उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विठ्ठलाच्या गीतांवर नृत्य केले. संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांच्यावर आधारित अभंग सादर केले. संयोजन धनराज गुटाळ, जयश्री डांगे यांनी केले. सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
केंब्रिज चॅम्प्स इंटरनॅशनल
कृष्णानगर येथील केंब्रिज चॅम्प्स इंटरनॅशनल प्री-स्कूलमध्ये चिमुकल्यांनी वारीचा आनंद घेतला. तसेच महात्मा फुलेनगर येथील गणपती मंदिरात विठूनामाचा गजर केला. शाळेत विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती तयार करत मुलांना मार्गदर्शन करण्यात आले. सर्व चिमुकल्यांना व पालकांना तुळशीचे रोप देऊन सन्मान करण्यात आला. कृष्णानगर शाखाप्रमुख कीर्ती जाधव यांनी आभार मानले.
डॉ. डी. वाय. पाटील इंग्लिश मीडियम
शाहूनगर येथील डॉ. डी. वाय. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल येथे भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशीनिमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात विठ्ठल रुक्मिणी व वारकऱ्यांच्या वेशभूषेत विद्यार्थी सहभागी झाले होते. विठ्ठल आणि ज्ञानोबा माऊलीच्या गजरात मुलांनी पालखी सोहळ्याचा आनंद लुटला. अभय कोटकर यांनी पालखीचे पूजन केले व मुलांचे कौतुक करून अभिनंदन केले. यावेळी सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
गुरु गणेश विद्यामंदिर
श्री गुरु गणेश विद्यामंदिर माध्यमिक व ज्युनिअर कॉलेजमध्ये आषाढी वारीनिमित्त अश्व रिंगण, ग्रंथ दिंडी व पर्यावरण दिंडीचे आयोजन करण्यात आले. प्राचार्य हनुमंत मारकड, पर्यवेक्षक हितेंद्र लोखंडे यांच्या हस्ते ग्रंथ दिंडीचे व विठ्ठलाच्या प्रतिमेचे प्रतिमेचे, अश्वपूजन करण्यात आले. दिंडी सोहळ्याचे नियोजन शिक्षक प्रतिनिधी सीमा जंगले, सहशिक्षक मारुती तोत्रे, लक्ष्मण गुंजाळ, सुखदेव तांबे, प्रीतम चोपडा, प्रिया नारखेडे, धनश्री कांबळे, सविता गुंड, सविता ठाकूर यांनी केले.
गेंदीबाई ताराचंद चोपडा
श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूल येथे आषाढी एकादशीनिमित्त रिंगण सोहळा व वारकरी खेळ आयोजित करण्यात आले. यावेळी अभिनेते संदीप साकोरे व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप जैन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य विक्रम काळे यांनी केले. यात त्यांनी वारकरी संप्रदाय, वारी आणि आषाढी एकादशीचे महत्त्व सांगितले.
साधना भालेकर व विद्यार्थिनींनी विविध अभंग सादर केले. राजवीर कांबळे, गुंजन देवासी, रुपेश अलुरकर, तन्वी उंप, भव्य जैन, तन्मय ओव्हाळ, पृथ्वीराज कुठे, रुद्र तानवडे, साई कसबे, आकांक्षा ढाके या विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी आणि संतांच्या वेशभूषा केल्या होत्या. संयोजन पर्यवेक्षक शशिकांत हुले यांनी केले. सूत्रसंचालन रामनाथ खेडकर यांनी; तर आभार अलका बारगजे यांनी मानले.
संचेती प्राथमिक विद्यालय
संचेती शैक्षणिक संकुलात आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला. सचिव वर्षा टाटिया, प्रमुख पाहुणे आदित्य टाटिया, ऐश्वर्या बेथमुथा, मुख्याध्यापक लक्ष्मण मोरे व मुख्याध्यापिका सुरेखा बिरादार यांनी ग्रंथ आणि विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचे पूजन केले. विद्यार्थ्यांनी विठ्ठलाच्या गीतांवर नृत्य व वारकरी फुगडी सादर केली. प्राथमिक विभागातील मुलांनी लेझीम, ढोल वादन सादर केले. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका सुरेखा बिरादार, मुख्याध्यापक- लक्ष्मण मोरे, ज्येष्ठ क्रीडा शिक्षक श्रीधर गायकवाड, उद्धव वाघमारे उपस्थित होते. सूत्रसंचलन अमृता पाटील यांनी केले. आभार शिक्षिका नंदिनी सुतार यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.