क्राइम
गुन्हे वृत्त
किरकोळ कारणावरून
रिक्षा चालकावर ब्लेडने वार
पिंपरी ः काळेवाडी परिसरात एका तरुणाने रिक्षाचालकाच्या घरासमोर येऊन शिवीगाळ केली व पोलिसांना बोलावल्याचे सांगितल्याने संतापून त्याच्यावर ब्लेडने वार केले. कोयता काढून दहशत निर्माण केली. ही घटना गणराज कॉलनी, आदर्शनगर, काळेवाडी येथे घडली.
प्रेम ऊर्फ सोन्या बालाजी पोतदार (२३, सांगवी) यास अटक करण्यात आली आहे. मधुकर विष्णू तमाके (५६, काळेवाडी) यांनी याबाबत काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
भोसरीत खंडणीखोरास अटक
पिंपरी ः भोसरीतील चक्रपाणी वसाहतीत एका दुकानदाराकडे दरमहा खंडणीची मागणी केली. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देत कोयता दाखवून दहशत निर्माण करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. शिवशंकर ऊर्फ दाद्या संभाजी राक्षे (३२, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पांडुरंग राजहंस बिरादार (२९, भोसरी) यांनी याबाबत भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बिरादार यांचे चक्रपाणी वसाहत येथे ओमसाई इलेक्ट्रिकल्स अँड गॅस रिपेअर्स नावाचे दुकान आहे. दुकान चालविण्यासाठी आरोपीने मार्च २०२४ पासून बिरादार यांच्याकडे दरमहा १२०० रुपये खंडणी मागितली होती. एक जुलै रोजी त्याने कोयता दाखवून एक हजार रुपये ऑनलाइन घेतले. आतापर्यंत आरोपीने २० हजार २०० रुपये जबरदस्तीने घेतले असून परिसरात दहशत पसरवली होती.
पुनावळेत परवानगीशिवाय जनावरांची वाहतूक
पिंपरी ः पुनावळे परिसरात भारत पेट्रोल पंपाजवळ एका ट्रकमध्ये परवानगीशिवाय व चारा-पाण्याची व्यवस्था न करता ३२ जनावरांची वाहतूक करताना एक चालक आढळून आला. रविकुमार हरीप्रसाद जोशी (वय ४०, गोवंडी, मुंबई) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार दिलीप शंकर साबळे (वय ३२) यांनी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीच्या ताब्यातील सहा लाख रुपयांच्या टाटा आयशर ट्रकमध्ये ९६ हजार रुपये किमतीची ३२ जनावरे कुठल्याही वैध परवान्याविना व अन्न-पाण्याशिवाय दाटीवाटीने भरलेली आढळून आली. या प्रकरणी प्राण्यांच्या छळविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
सेवानिवृत्त व्यक्तीची २० लाखांची फसवणूक
पिंपरी ः सेवानिवृत्त व्यक्तीला पेन्शन चालू करण्याच्या बहाण्याने मोबाईलवर ओटीपी घेत सहा बँक खात्यांवर तब्बल २० लाख रुपये ट्रान्सफर करून निवृत्त व्यक्तीची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. ही घटना देहूरोड परिसरात घडली. जगदीशचंद्र बनिक (वय ६०, देहूरोड) यांनी मंगळवारी (ता. ८) याबाबत देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने फिर्यादीस फोन करून पेन्शनसाठी अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. नंतर सहा बँक खाते व्यक्तीच्या बँक खात्याशी जोडण्यास सांगितले. व्यक्तीकडून ओटीपी घेऊन खात्याशी लिंक केलेल्या चार खात्यांमध्ये प्रत्येकी पाच लाख रुपयांची रक्कम फिर्यादीच्या बँक ऑफ इंडिया खात्यातून ट्रान्स्फर केली. या प्रकारात एकूण २० लाखांची फसवणूक झाली आहे.
किरकोळ कारणांनी मारहाण
पिंपरी ः वाकड परिसरात एका युवकाच्या घरात घुसून महिलांसह अन्य नातेवाइकांवर प्लास्टिक खुर्च्या व दगडाने हल्ला करण्यात आला. ही घटना वाकडमधील कलाटे नगर येथे घडली. या प्रकरणी संतोष चंद्रकांत चक्रे (वय ४२), नीलेश आल्हाट (वय ३७) आणि त्यांच्यासोबत असलेले महिलेसह अन्य दोन-तीन नातेवाईक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयूर अविनाश पाटील (वय २४, वाकड) यांनी मंगळवारी वाकड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.