अकरावीचे विद्यार्थी अनुदानित जागेच्या प्रतीक्षेत
पिंपरी, ता.९ ः केंद्रीय पद्धतीने अकरावीचे ऑनलाइन प्रवेश सुरू आहेत. त्यामध्ये अर्ज भरताना पात्र असूनही केवळ माहितीअभावी अनुदानित ऐवजी विनाअनुदानितला ‘क्लिक’ केल्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण झाली आहे. प्रवेश नाकारला; तर तो विद्यार्थी आपोआपच प्रक्रियेतून बाहेर पडणार असल्याने त्याच्यासमोर शैक्षणिक नुकसानीचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे, प्रवेश निश्चितीस येणाऱ्या विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आहे. त्याचा अनेक विद्यार्थी व पालकांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे.
यंदा दहावी परीक्षेचा निकाल १३ मे रोजी जाहीर असून दहावीला १९ हजार ४६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पिंपरी चिंचवड विभागातून १९ हजार ९१६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यानंतर केंद्रीय पद्धतीने अकरावीचे ऑनलाइन प्रवेश सुरू झाले. त्यात पिंपरी चिंचवड विभागातून १९ हजार ९१६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. दरम्यान प्रथम गुणवत्ता यादी २८ जून रोजी जाहीर करण्यात आली. अकरावीच्या पहिल्या गुणवत्ता यादीत ७ जुलैपर्यंत काही विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. एकूण नोंदणीच्या ३२ टक्के प्रवेश पूर्ण झाले असल्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत सांगण्यात आले आहे. याशिवाय रिक्त प्रवेशाबद्दल बोलताना ज्या विद्यार्थ्यांना अनुदानित कोट्यात प्रवेश मिळाला नाही; त्यांनी गुणवत्तेच्या आधारे दुसऱ्या यादीसाठी वाट पाहणे योग्य समजले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील प्रवेश प्रक्रियेत वाढीव प्रवेश होण्याचा अंदाज शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.
तब्बल एक महिन्याच्या प्रतिक्षेनंतर शहरातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याने विद्यार्थी व पालकांची गर्दी होऊ लागली आहे. विद्यार्थी पालकांसाठी प्रवेश प्रकियेत पारदर्शकता व सुलभता येण्याऐवजी मनस्तापच सहन करावा लागत आहे. ऑनलाइन अर्ज भरताना महाविद्यालय निवडीवेळी अनुदानित व विनाअनुदानित असे दोन पर्याय होते. काही विद्यार्थ्यांकडून माहिती अभावी किंवा अज्ञानाने अनुदानित ऐवजी विनाअनुदानित पर्यायावर ‘क्लिक’ केले गेले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चितीवेळी प्रवर्गनिहाय आरक्षण व अनुदानित तुकडीतील प्रवेशासाठी पात्र असताना प्रवेश मिळू शकत नाही. प्रवेश प्रक्रिया पुढे गेली असून हरकती नोंद किंवा दुरुस्तीची संधीही हुकली आहे. ऐन प्रवेशावेळी ही गोष्ट समोर आल्याने विद्यार्थी व पालकांचा गोंधळ उडाला आहे
गुणवत्ताधारकांनाही फटका
आजी माजी सैनिक पाल्य, उच्च गुणवत्ताधारकांनाही याचा फटका बसला आहे. पहिल्या गुणवत्ता यादीत प्रवेशाची संधी असताना केवळ विनाअनुदानित म्हणून प्रवेश नाकारला; तर प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडणार आहे. त्यामुळे वर्ष वाया जाऊन शैक्षणिक नुकसानीचा धोका संभवतो. परिणामी, विद्यार्थ्यांच्या पालकांना शुल्क भरावे लागणार असल्याने आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.
‘‘७ जुलैपर्यंत काही विद्यार्थ्यांनी प्रवेश पूर्ण केले आहेत. यंदा विभागातून विद्यार्थ्यांनी मागितल्याप्रमाणे त्यांना प्रवेश मिळत आहेत. प्रतीक्षेतील विद्यार्थ्यांचे दुसऱ्या यादीत अधिक प्रवेश होतील. विद्यार्थ्यांना मदत केंद्रामार्फत मदत केली. सायबर कॅफेऐवजी विद्यार्थी आणि पालकांनी शाळेतच जाऊन अकरावी अर्ज भरावेत.’’
- विक्रम काळे, सदस्य, अकरावी केंद्रीय प्रवेश समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.