महिलांच्या सक्षमा पोर्टलचे उद्‍घाटन

महिलांच्या सक्षमा पोर्टलचे उद्‍घाटन

Published on

पिंपरी, ता. १० ः महिला सक्षमीकरणासाठी महापालिका समाज विकास विभाग आणि टाटा स्ट्राईव्हने ‘एसएचजी ई-पोर्टल’वरील ‘सक्षमा’ पेज तयार केले आहे. यामुळे स्वतः तयार केलेल्या वस्तू विक्रीसाठी महिलांना व्यासपीठ उपलब्ध होणार असून त्यांच्या रोजगार निर्मितीच्या संधी मोठ्या प्रमाणावर निर्माण होतील, असा विश्‍वास आयुक्त शेखर सिंह यांनी दिला.
‘सक्षमा प्रकल्पा’अंतर्गत महिला बचत गटांच्या वस्तू विक्रीसाठी केलेल्या ‘सक्षमा’ पेजच्या उद्‍घाटनप्रसंगी आयुक्त सिंह बोलत होते. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, उपआयुक्त ममता शिंदे, सहाय्यक समाज विकास अधिकारी संतोषी चोरघे, टाटा स्ट्राईव्हचे प्रतिनिधी अमेय वंजारी, बिचिथा जॉयसे, स्नेहल विचारे, सचिन उपाध्याय, संतोष डोंगरे, अश्विनी सांगेकर आदी उपस्थित होते. नव्या डिजिटल उपक्रमाच्या माध्यमातून महिलांनी बनविलेल्या वस्तूंना नव्या बाजारपेठा उपलब्ध होतील आणि त्यातून रोजगार व उत्पन्नाच्या संधी मोठ्या प्रमाणावर निर्माण होतील. सक्षमा प्रकल्पाअंतर्गत आतापर्यंत आठ महिला फेडरेशनची स्थापना केली आहे. या फेडरेशनद्वारे महिलांना व्यावसायिक संधी आणि सक्षमीकरणासाठी भक्कम आधार देण्यात येत आहे. महिलांनी बनविलेल्या वस्तूंची पाहणी करून आयुक्तांनी त्यांचे कौतुक केले. फेडरेशनच्या महिला पदाधिकाऱ्यांचा प्रोत्साहनपर सन्मानही केला.

सन्मानित महिला फेडरेशन
अ क्षेत्र ः संजीवनी फेडरेशन - अध्यक्ष असमा मुलानी, सचिव कविता खराडे, खजिनदार विभा इंगळे
ब क्षेत्र ः उडान फेडरेशन - अध्यक्ष वर्षा सोनार, सचिव अनिता मठपती, खजिनदार वैशाली घाटके
क क्षेत्र ः स्वरुपा फेडरेशन - अध्यक्ष सिंधू किवळे, सचिव स्नेहा गिरधारी, खजिनदार संध्या परदेसी
ड क्षेत्र ः आरंभ फेडरेशन - अध्यक्ष उषा काळे, सचिव मीनल ठेंगे, खजिनदार मीनाक्षी शेट्टीवार
इ क्षेत्र ः झेप फेडरेशन - अध्यक्ष रेखा सोमवंशी, सचिव संगीता सस्ते, खजिनदार उर्मिला वाकचौरे
फ क्षेत्र ः एकता फेडरेशन - अध्यक्ष उमा साळवीकर, सचिव रेश्मा घुले, खजिनदार कमल सोनवणे
ग क्षेत्र ः गरुड झेप फेडरेशन - अध्यक्ष माधुरी भोसले, सचिव सुवर्णा सोनवळकर, खजिनदार लता गायकवाड
ह क्षेत्र ः अल्फा फेडरेशन - अध्यक्ष कोमल गावधनकर, सचिव राखी धार, खजिनदार रचना वारे

‘‘पिंपरी-चिंचवड शहरातील महिलांमध्ये विविध कौशल्ये आहेत. परंतु त्यासाठी योग्य बाजारपेठ मिळवणे मोठे आव्हान होते. आजच्या डिजिटल युगात सक्षमा ई-पोर्टल हे त्यादृष्टीने एक मोठे पाऊल आहे. समाज विकास विभागामार्फत शहरातील सर्व महिलांना याचा लाभ देण्याचा प्रयत्न आहे.
- ममता शिंदे, उपआयुक्त, समाज विकास विभाग, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com