संवाद माझा

संवाद माझा

Published on

साने चौकात रस्त्याची अवस्था बिकट
चिखलीतील साने चौक रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. हा रस्ता दुरुस्त करून घ्यावा आणि संभाव्य अपघात थांबवावेत. या चौकात दिवस रात्र वाहतूक कोंडी असते. त्यावर कोणीही उपाययोजना करत नाही. येथे उड्डाणपूल उभारण्यात यावा. यामुळे दररोजची वाहतूक कोंडीची समस्या सुटेल.
- पुष्‍पराज आंब्रे, पिंपळे सौदागर
PNE25V30155

माती, डबर वाहतुकीने रस्ते चिखलमय
तळेगाव स्टेशन ते जिजामाता चौकाकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या आगारासमोर रेल्वेच्या परिसरातून डंपरमधून माती, डबर वाहतूक होत आहे. यामुळे रस्त्यावर चिखल पसरतो आहे. पादचारी आणि दुचाकीस्वारांना या चिखलाचा त्रास होत आहे. अनेक वाहने घसरून पडत आहेत. नगर परिषद प्रशासनाने रस्ते सुरक्षा आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन या चिखलमय रस्त्याची स्वच्छता करावी. पावसाळ्यात अशी कामे होऊ नयेत, याची काळजी घ्यावी. दिवसभर डंपरची वाहतूक आणि रात्रीच्या वेळी कंपनी बसेस या मोकळ्या ठिकाणी असतात. त्यांच्या येण्या-जाण्याने परिसरातील माती, डबर आणि दगड मुख्य रस्त्यावर येत आहेत. हे नागरिक आणि वाहनचालकांना धोकादायक झाले आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे
- दिलीप डोळस, तळेगांव दाभाडे
PNE25V30154

रस्त्याचे काम पावसाळ्यात
कुणाल आयकॉन ते पिंपळे सौदागर हा रस्ता करणे तब्बल २० वर्षांनी सुरूवात करण्यात आली आहे. पण, त्यासाठी पावसाळ्याचे दिवस निवडण्यात आला आहे. सदर रस्ता एकेरी ठेवा, यासाठी ‘सारथी’वर सूचना केली. तर ‘‘वाहतूक विभागाकडे पाठवले’’ असे तोंडदेखले उत्तर आले. गोविंद गार्डन ते साई चौक एकमार्गी (वन वे) याच कामासाठी केला आहे. या मार्गावर सकाळी आणि दुपारी शाळांच्या बसेसची कोंडी असते. कामाचे स्वरुप, लागणारा कालावधी, ठेकेदार कंपनी या संदर्भातील फलक कुठेही नाहीत.
- अतुल कुमठेकर, पिंपळे सौदागर
PNE25V30156

बॅरिकेड्स लावून अतिक्रमण
चिंचवड अजंठानगर येथे एमएनजीएल पंपाबाहेरून दोन्ही रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा होईल, असे बॅरिकेड्स लावून अतिक्रमण केलेले आहे. त्यामुळे वाहतूक तसेच पादचाऱ्यांना रस्त्यावर आणून अडथळा निर्माण केलेला आहे. अंधारात अपघात होण्याची शक्यता आहे. असे अतिक्रमण करणाऱ्यांवर वाहतूक पोलिस आणि पालिका प्रशासनाने कठोर कारवाई करावी. येथील बॅरिकेड्स कायमस्वरुपी काढून टाकले जावेत.
- बी. एस. पाटील, चिंचवड, अजंठानगर
PNE25V30157

ड्रेनेज चेंबरची झाकणे असमतल
दापोडी येथील गणेश इंग्लिश स्कूल येथे ड्रेनेज चेंबर दुरुस्ती करणे आवश्यक आहे. शहरात ठिकठिकाणी ड्रेनेज चेंबरची झाकणे समपातळीत नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. चेंबरमुळे होणाऱ्या खड्ड्यांमुळे अपघात होतात. तसेच पाठदुखी, कंबरदुखीचाही त्रास वाहनचालकांना होत आहे. यामुळे शाळकरी मुलांचा अपघात होण्याची शक्यता आहे.
- अकिल अ. शेख, दापोडी
PNE25V30153

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com