शिष्यवृत्ती परीक्षेत शहराचा निकाल ३४ टक्के

शिष्यवृत्ती परीक्षेत शहराचा निकाल ३४ टक्के

Published on

पिंपरी, ता. ११ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत पिंपरी-चिंचवड शहराचा ३४.३८ टक्के निकाल लागला आहे.
यात पूर्व उच्च प्राथमिक ( इयत्ता पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इयत्ता आठवी) परीक्षेत पाचवीचे १२६ विद्यार्थी, तर इयत्ता आठवीचे ९९ विद्यार्थी पुणे जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत झळकले आहेत. यात महापालिका शाळेतील १७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
इयत्ता पाचवीतून शहरातील ३६२ शाळांमधून ८,४०९ विद्यार्थी प्रविष्ट झाले. त्यापैकी २,७८२ विद्यार्थी पात्र ठरले. गुणवत्ता यादीतील १२६ पैकी ११ विद्यार्थी महापालिका शाळांतील आहेत.
इयत्ता आठवीच्या २८० शाळांमधून ६,००७ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी १,६१५ विद्यार्थी पात्र ठरले असून ९९ विद्यार्थी पुणे जिल्हयाच्या गुणवत्ता यादीत आले आहेत. यात महापालिकेच्या शाळेतील ६ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहे.

महापालिका शाळांतील गुणवत्ता यादीतील विद्यार्थी
इयत्ता पाचवी : स्वरा सुनील ढवळे, राधिका विश्वनाथ आंग्रे, सर्वेज्ञा नीलेश गायकवाड, आरोही दत्तात्रय नेहरकर, राजहंस रामदास वाघमारे, शाह अबु आकिब अबु तारीक, प्रज्ञा अर्जुन काळे, आरोही विशाल जोशी, स्नेहल विकास चव्हाण, प्रणव सिद्धार्थ वाघमारे, अमृता बाळासाहेब शिंदे.

इयत्ता आठवी : शशिकला राहुल थोरात, फरहिन नौशाद शेख, अदिती प्रल्हाद पवळे, विश्‍वक्रर्मा जयवंता महेर, निशा भनाजी गायकवाड, सोमनाथ शुभम इतागी
-----------

Marathi News Esakal
www.esakal.com