गुन्हे वृत्त
बनावट सोनसाखळी गहाण ठेवून फसवणूक
पिंपरी : बनावट सोनसाखळी खरी असल्याचे सांगून ती गहाण ठेवली. त्यावरून एका दागिन्यांच्या दुकानातून एक लाख रुपये घेऊन फसवणूक केली. हा प्रकार चिंचवड घडला. याप्रकरणी श्रीपाल सागरमल सोनिग्रा (रा. काकडे पार्क, चिंचवड) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राकेश भवानजी पासद (रा. नाने चौक, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने १६.३४० ग्रॅम वजनाची तांब्याची साखळी ही २२ कॅरेट सोन्याची असल्याचे भासवून दिलीप सोनिग्रा ज्वेलर्स या दुकानात गहाण ठेवली. त्यानुसार दुकानदाराकडून एक लाख रुपये उचलले. नंतर ती सोनसाखळी बनावट असल्याचे समोर आले.
भरधाव वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
पिंपरी : दुचाकीवरून जात असताना अज्ञात भरधाव वाहनाने धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना तळवडेतील कॅनबे चौक येथे घडली. प्रतीक राजकुमार वाबळे (वय २२) असे या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी राजकुमार वसंत वाबळे (रा. तुकारामनगर, तळवडे) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल झाला आहे. प्रतीक हा दुचाकीवरून जात असताना अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीस धडक दिली. अपघातानंतर वाहनचालकाने कोणतीही मदत न करता पसार झाला.
कुत्र्याचा ज्येष्ठ नागरिकाला चावा
पिंपरी : पाळीव कुत्र्याने ज्येष्ठ नागरिकाच्या पायाला चावा घेऊन जखमी केले. तसेच याबाबत जाब विचारला असता त्यांना धमकी दिली. हा प्रकार मुळशीतील नांदगाव येथे घडला. या प्रकरणी अतुल गणेश ढमाले (रा. ढमाले वस्ती, नांदगाव) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी एका महिलेने बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीचे पती साहेवराव ढमाले (वय ६५) हे त्यांच्या घराशेजारी जात होते. त्यावेळी आरोपीच्या पाळीव कुत्र्याने त्यांच्या गुडघ्याला चावा घेतला. त्यानंतर याबाबत जाब विचारल्यावर आरोपीने शिवीगाळ करून दहा कुत्रे अंगावर सोडीन अशी धमकी दिली.
कोयत्याने वार करीत माजवली दहशत
पिंपरी : पोलिसांसोबत येरवडा जेलमध्ये जाऊन दोघांना का ओळखलेस असे, चौघा जणांनी मिळून एका अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. तसेच परिसरात दहशत माजवली ही घटना शिवशक्ती कॉलनी, श्रीनगर, रहाटणी येथे घडली. याप्रकरणी रहाटणीतील श्रीनगर येथील मोहन नखाते चाळ येथील अल्पवयीन मुलाने काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुनील शेट्टी ऊर्फ सुनील ठाकूर (वय २५), सूरज ऊर्फ पिल्या भालचंद्र शिंदे (वय १८, रा. सोमद्वार कॉलनी), शिव-या ऊर्फ शिवराज ज्ञानदेव चव्हाण (वय १९, रा. समता कॉलनी, रहाटणी), चंग्या ऊर्फ कृष्णा श्यामराव धाईजे (वय २०, रा. अमरदीप कॉलनी, रहाटणी) यांना पोलिसांची अटक केली आहे. फिर्यादी हा शिवशक्ती कॉलनी समोर उभा होता. त्यावेळी आरोपी दुचाकीवरून आले. त्यांनी फिर्यादीस शिवीगाळ करत तू पोलिसांसोबत येरवडा जेलमध्ये ओळख का दिली, असे म्हणत मारहाण केली. यावेळी आरोपी सूरज याने कोयत्याने डोक्यात तीन वार करीत परिसरात दहशत माजवली.
परतावा आमिषाने सव्वा कोटींची फसवणूक
पिंपरी : शेअर ट्रेडिंग आणि फॉरेक्समधून मोठा परतावा देतो, असे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची एक कोटी ३४ लाख ४९ हजार रुपयांची फसवणूक केली. महिला फिर्यादीच्या तक्रारीवरून नवनाथ जगन्नाथ अवताडे (वय ४८), राहुल श्यामराव काळोखे (वय ४३), गौरव देविदास सुखदेव (वय ४८), प्रसाद बाजीराव देशमुख (वय ४५), विनायक ज्ञानदेव मराठे (वय ५०), प्रसाद प्रकाशराव कुलकर्णी (वय ४६), फंड मॅनेजर अगस्त मिश्रा (वय ३४), एजंट सतीश जगताप (वय ४७) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.