संवाद माझा
बसथांब्यापुढील अतिक्रमण हटवा
फुलांचा बाजार येथील बस थांब्यासमोर एक नारळांचा टेम्पो आणि त्याच्यापुढे नारळाची हातगाडी उभी केल्यामुळे बस थांबावायला. रस्त्याच्या मध्यवर्ती थांबावे लागते. त्याच्याकडे कोणी लक्ष देईल का ?
- पंढरीनाथ म्हस्के, दापोडी
PNE25V30577
पिंपळे निलखमधील खड्डे बुजवा
पिंपळे निलख येथे माजी सरपंच चंद्रकांत जगताप पथावर एका जागी उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांसाठी संरक्षण खात्याच्या जागेतून तात्पुरता रस्ता बनविला आहे. मात्र, त्या रस्त्यावर काही जागी खड्डे पडले असल्याने वाहन चालकांची गैरसोय होत आहे. तरी महापालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाने संबंधित तक्रारीची दाखल घ्यावी.
- सनी शिंदे, पिंपळे निलख
NE25V30582
प्रवाशांच्या अपघाताची भीती
शितळादेवी पेट्रोल पंप चौक दापोडी येथील बस थांब्यासमोर गटारा सारखे पाणी साचल्यामुळे आणि विरुद्ध बाजूने येऊन थांबलेल्या वाहनांमुळे प्रवाशांना बससाठी थांबणे खूप अवघड होते आहे. अरुंद रस्ता असल्यामुळे प्रवासी रस्त्यावर थांबून अपघात होण्याची शक्यता आहे. तरी संबंधितांनी याकडे लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी.
- अमोल जाधव, दापोडी
NE25V30578
आरोग्य विभागाने कचरा उचलावा
रहाटणी येथील नखाते चौकातील साईज्योत पार्क येथे महापालिकेच्या झाडांच्या फांद्या तोडून १० दिवस झाले आहेत. कचरा तसाच पडून आहे. सारथीला तक्रार केली आहे. मात्र त्यावर कार्यवाही न करता ती बंद केली. तरी आरोग्य विभागाने लक्ष घालून तेथील सफाई करावी.
- बापूसाहेब चव्हाण, नखाते चौक, रहाटणी
PNE25V30581
चाकण, खेड भागात रस्ता रुंदीकरण करा
दरवेळी निवडणुकांची आचारसंहिता संपली की वाटते की आता नाशिक फाटा ते राजगुरुनगर व तळेगाव ते शिक्रापूर रस्त्याचे काम सुरू होईल. कारण, हा रस्ता वीस वर्षांपासून मंजूर झाला आहे. निविदा प्रक्रिया मागील पंधरा वर्षांपासून सुरु आहे. पण, प्रत्यक्षात या रस्त्याचे काम सुरू व्हायला अजून किती दशके लागतील देव जाणे. चाकण - खेड भागात मागील पंधरा वर्षांत वाहतूक वीस पट वाढली; पण इथे रस्ता रुंदीकरण झालेच नाही.
- राजेश अग्रवाल, एम्पायर इस्टेट, चिंचवड
PNE25V30580
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.